फटाके सेनेचे, जल्लोष राष्ट्रवादीचा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 नोव्हेंबर 2019

नागपूर : राज्यात अभूतपूर्व गोंधळाची स्थिती निर्माण झाली असून मिनिटामिनिटाला राजकीय स्थिती बदलत आहे. शिवसेनेचे नेते राज्यपालांकडे सत्तेचा दावा स्थापन करण्यासाठी जाताच शिवसैनिकांनी ठिकठिकाणी फटाके फोडले. मात्र ते विझण्याच्या आतच राष्ट्रवादी कॉंग्रेसला राज्यपालांनी निमंत्रण दिल्याने सर्वांच्या उत्साहावर विरजण पडले. 

नागपूर : राज्यात अभूतपूर्व गोंधळाची स्थिती निर्माण झाली असून मिनिटामिनिटाला राजकीय स्थिती बदलत आहे. शिवसेनेचे नेते राज्यपालांकडे सत्तेचा दावा स्थापन करण्यासाठी जाताच शिवसैनिकांनी ठिकठिकाणी फटाके फोडले. मात्र ते विझण्याच्या आतच राष्ट्रवादी कॉंग्रेसला राज्यपालांनी निमंत्रण दिल्याने सर्वांच्या उत्साहावर विरजण पडले. 

राज्यात कोण सत्ता स्थापन करेल हे कोणीच दाव्याने आजतरी सांगू शकत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सर्वाधिक मोठा पक्ष म्हणून राज्यपालांनी भाजपला सत्तास्थापनेसाठी निमंत्रित केले होते. मात्र बहुमत नसल्याने भाजपने यास नकार दिला. त्यामुळे रविवारी शिवसेनेला पाचारण केले. आज दिवसभर शिवसेना आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये चर्चेच्या फैरी झडल्या. कॉंग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी तातडीने बड्या नेत्यांची बैठक बोलावली. त्यानंतर सात वाजताच्या सुमारास युवा सेनेचे प्रमुख व नवविर्वाचित आमदार आदित्य ठाकरे आणि गटनेते एकनाथ शिंदे राज्यपालांकडे सत्ता स्थापन करण्यासाठी गेले. त्यामुळे दोन्ही कॉंग्रेसने होकार दिला असाच अर्थ काढण्यात आला. त्यामुळे शिवसेनेच्या जल्लोशाला सुरुवात झाली. उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीची तारीखही जाहीर करण्यात आली. काही समाजमाध्यमांनी बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन रविवारी असल्याने (ता. 17) याच दिवशी उद्धव ठाकरे शपथ घेतील असे दावे करण्यास सुरुवात केली. दुसरीकडे नागपूरमध्ये शिवसेनेचे पदाधिकारी एकत्र आले, त्यांनी फटाके फोडले. मिठाई वाटून आनंद साजरा केला. मात्र त्याच वेळी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने पाठिंब्याचे पत्र दिले नसल्याचे वृत्त समोर येताच सर्वांचा हिरमोड झाला. 

सस्पेन्स कायम 
राज्यपालांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसला सत्ता पाचारण करण्यासाठी आमंत्रण दिले आहे. त्यांनाही चोवीस तासांची मुदत दिली. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कुठलाही वेळ न दवडता लगेच राज्यपालांची भेट घेतली. मात्र त्यांच्याकडे मंगळवारचा दिवस शिल्लक असल्याने त्यांनी राज्यपालांसोबत झालेल्या भेटीची माहिती गुलदस्त्यात ठेवून सस्पेंस कायम ठेवला. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shivsena, nationalist congress party