esakal | धक्कादायक! वणी येथे खड्ड्यातील पाण्यात बुडून चिमुकल्याचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

vayatmal

धक्कादायक! वणी येथे खड्ड्यातील पाण्यात बुडून चिमुकल्याचा मृत्यू

sakal_logo
By
तुषार अताकरे

वणी: शहरातील गोकुळनगराच्या मागील बाजूस असलेल्या खड्ड्यातील पाण्यामध्ये बुडून दोनवर्षीय बालकाचा मृत्यू झाला. ही घटना आज शनिवारी (ता.4) दुपारी घडली. सिद्धार्थ सुनील पोटे असे दोनवर्षीय बालकाचे नाव आहे. सुनील पोटे यांचा तो मुलगा असून, सुनील हे आपल्या परिवारासह गोकूळनगरात वास्तव्यास आहेत. मोलमजुरी करून ते आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह चालवितात.

हेही वाचा: खासदार पुत्रावर अत्याचाराचा आरोप; पोलिस महानिरीक्षकांकडे तक्रार

दरम्यान, आज शनिवारी सुनील हे कामासाठी बाहेर गेले होते व त्यांची पत्नी सविता घरातील कामे करीत होती. पोटे यांच्या घराच्या मागील बाजूस असलेल्या जागेवर माती खोदून नेल्याने त्या ठिकाणी मोठंमोठे खड्डे निर्माण झालेले आहेत. या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचले आहे. सिद्धार्थ हा खेळता खेळता त्या खड्ड्यात पडला. बराच वेळ होऊनही सिद्धार्थ दिसत नसल्याने आईने त्याचा शोध घेतला.

मात्र, त्याचा पत्ता लागत नसल्याने तो खड्ड्यातील पाण्यात तर पडला नसावा ना, असा अंदाज लावून त्याचा शोध घेण्याचा निर्णय घेण्यात आला. नगरपालिकेचे प्रभारी आरोग्य निरीक्षक भोळेश्वर ताराचंद यांनी आपल्या सहकार्‍यांसोबत या खड्ड्यातील पाण्यात त्याचा शोध घेतला असता, मृतदेह आढळून आला.

हेही वाचा: एकनाथ शिंदे यांना अवमानना नोटीस; उत्तर सादर करण्याचे आदेश

बालकाचा मृतदेह पाहताच आईवडिलांनी एकच हंबरडा फोडला. बालकाचा दुर्दैवी मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार व नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिवाराचे सांत्वन केले.

loading image
go to top