Buldhana News: पशुवैद्यकाने भर रस्त्यात स्वतःला पेटविले; उपचारादरम्यान मृत्यू ,निमगाव फाट्यावरील घटना
Mental Health Crisis: पिंपळगाव काळे येथील खासगी पशुवैद्यक चंद्रकांत पाटील यांनी रस्त्यावर अंगावर पेट्रोल ओतून जीव दिला. कौटुंबिक वादामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावा, असा प्राथमिक अंदाज आहे.
नांदुरा : जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे येथील एका खासगी पशुवैद्यकाने भर रस्त्यात अंगावर पेट्रोल ओतून स्वतःला पेटवून घेत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना बुधवारी सकाळी घडली. गंभीर अवस्थेत अकोला येथे नेले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.