Selfie With Tiger sakal
विदर्भ
Selfie With Tiger : वाघासोबत ‘सेल्फी’, दगडही मारले; तई येथील धक्कादायक प्रकार; वन विभागाने केले ‘रेस्क्यू’
Wildlife Protection : भंडारा जिल्ह्यातील तई गावात एका धक्कादायक घटनेत काही हुल्लडबाजांनी वाघासोबत सेल्फी घेतली आणि त्याला दगडही मारले. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहचून पाच तासांच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर वाघाला जेरबंद केले.
लाखांदूर (जि. भंडारा) : वाघीण आणि तिच्या पिल्लांचा रस्ता अडविण्याचा प्रकार ताजा असतानाच झुडपात बसलेल्या वाघाला घेरत दोन ते पाच फूट अंतरावरून ‘सेल्फी’ घेण्याचा धक्कादायक प्रकार भंडारा जिल्ह्यात घडला आहे. हा संतापजनक आणि तेवढाच धोकादायक प्रकार लाखांदूर तालुक्यातील तई बु. गावालगत बुधवारी सकाळी साडेआठच्या सुमारास घडला.