

हिंगणघाट (जि. वर्धा) : येथील नंदोरी चौकातील निखाडे कॉम्प्लेक्सजवळ दुचाकीवर संशयितरीत्या फिरणाऱ्या दोन अज्ञात व्यक्तींना हटकल्याने त्यांनी एका पोलिस कर्मचाऱ्यावर देशी कट्ट्यातून गोळी झाडली. नेम चकल्याने मोठा अनर्थ टळला. पोलिस या गुंडांचा शोध घेत आहेत. ही घटना बुधवारी (ता. ११) रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली.
पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस जमादार कमलाकर धोटे हे रात्री ११ वाजताच्या सुमारास निखाडे कॉम्प्लेक्सजवळ असलेल्या पानटपरीवर गेले. तिथे दोन युवकांनी गाडी थांबवून पोलिस कर्मचारी धोटे यांना वरोरा येथे जाण्याचा मार्ग विचारला. त्यानंतरही ते दोघे तेवढ्यातच घुटमळत होते. दरम्यान, तिथेच उभे असलेले माजी नगरसेवक अनिल भोंगाडे यांना या दोघांचे वर्तन संशयास्पद दिसले. त्यांनी जवळ उभे असलेले पोलिस जमादार कमलाकर धोटे यांना याबदल माहिती दिली.
कमलाकर धोटे यांनी दोन संशयितांना विचारपूस केली असता त्यांनी देशीकट्टा काढला आणि पोलिस जमादार धोटेवर ताणला. यानंतर दोघांत झटापट झाली. यादरम्यान देशीकट्ट्यातून गोळी चालली. सुदैवाने गोळी हवेत चालल्याने मोठा अनर्थ टळला. अनिल भोंगाडे हे पोलिस धोटे यांचा बचाव करण्यासाठी धावले. आरोपीला त्यांना वीट फेकून मारली. त्यामुळे एका आरोपीने आपल्या बॅगमधून कुठले तरी दुसरे हत्यार काढण्याचा प्रयत्न केला. नंतर दोघेही पळून गेले.
आरोपी तेलुगूमिश्रित हिंदी बोलणारे
दोन्ही आरोपी २५ ते ३० या वयोगटातील असून तेलुगूमिश्रित हिंदी बोलत होते. तसेच त्यांच्याजवळ मोटारसायकल होती. अनिल भोंगडे यांनी हिंगणघाट पोलिस ठाण्यात फोन करून महिती दिली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले. हिंगणघाट पोलिस तपास करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.