दुकानावर सुरू होती मोहफुलाची विक्री; मग झाले असे...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 एप्रिल 2020

शहरातील सोमठाणा (मानोरा) भागातील मानोरा- मंगरुळपीर रोडवर मोहफुल विक्रीच्या दुकानावर छापा मारला.

मानोरा (जि.वाशीम) : शहरातील सोमठाणा परिसरातील मोहफुल विक्री दुकानावर (ता.8) सकाळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा मारला. यावेळी मोहफुलांनी भरलेले 156 पोते जप्त केले. या प्रकरणी मानोरा पोलिसांत दाखल फिर्यादीवरून पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त केलेला माल वाहनाद्वारे पोलिस ठाण्याच्या आवारात आणला आहे.

या कारवाईबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, स्थानिक गुन्हे शाखेला गोपनिय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पीएसआय पायघने व त्यांच्या सहकाऱ्यांनी शहरातील सोमठाणा (मानोरा) भागातील मानोरा- मंगरुळपीर रोडवर मोहफुल विक्रीच्या दुकानावर छापा मारला. यावेळी मोहफुलांनी भरलेले 156 पोते (अंदाजे किंमत 6 लाख 64 हजार) जप्त केले. तसेच सदरील जप्त केलेला माल वाहनाद्वारे मानोरा पोलिस ठाण्याच्या आवारात आणून ठेवला आहे. 

हेही वाचा - अकोल्यात कोरोना पॉझिटिव्हची संख्या नऊवर

या प्रकरणी पीएसआय पायघने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमित जयस्वाल (राजाकिन्ही), अशोक नोळे यांच्यासह अन्य तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पीएसआय पायघन, नापोकॉं सुनील पवार, प्रशांत राजगुरू, राजेश राठोड, अमोल इंगोले, बालाजी बरवे, रमेश थोरवे, प्रेम राठो, संतोष शेणकुडे यांच्या पथकाने केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The shop starts selling Mohul flowers