संचारबंदीतही दुकान सुरूच, पोलिसांचा कारवाईचा बडगा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 मार्च 2020

सध्या संपूर्ण राज्यात कलम 144 अंतर्गत संचारबंदी लागू करण्यात आली असून अत्यावश्‍यक सेवा म्हणून तालुक्‍यातील विविध गावातील किराणा, भाजीपाला, मेडिकल यासारख्या दुकान विक्रेत्यांसाठी सकाळी 8 ते 12 वाजेपर्यंत सूट देण्यात आली होती. मात्र, आसरा येथे गावात सायंकाळी 5 वाजले तरी काही दुकाने सुरू असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यांनी या सर्व दुकानांवर कायदेशीर कारवाई केली. किराणा दुकानदारावर कलम 144 च्या कलमाचे उल्लंघन म्हणून अटक करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

भातकुली (जि. अमरावती) : भातकुली पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या आसरा या गावी काही दुकानदारांनी कलम 144 चे उल्लंघन करीत संचारबंदीतही दुकान सुरू ठेवल्याने त्यांच्यावर भातकुली पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली.
सध्या संपूर्ण राज्यात कलम 144 अंतर्गत संचारबंदी लागू करण्यात आली असून अत्यावश्‍यक सेवा म्हणून तालुक्‍यातील विविध गावातील किराणा, भाजीपाला, मेडिकल यासारख्या दुकान विक्रेत्यांसाठी सकाळी 8 ते 12 वाजेपर्यंत सूट देण्यात आली होती. मात्र, आसरा येथे गावात सायंकाळी 5 वाजले तरी काही दुकाने सुरू असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यांनी या सर्व दुकानांवर कायदेशीर कारवाई केली. किराणा दुकानदारावर कलम 144 च्या कलमाचे उल्लंघन म्हणून अटक करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.नागपूर

सविस्तर वाचा - अकरा विदेशींना ठेवले होम क्वॉरेंटाइनमध्ये! पोलिसांनी छापा टाकून घेतले ताब्यात

पोलीस उपायुक्त शशिकांत सातव यांच्या मार्गदर्शनात भातकुलीचे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार वाकसे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संतोष खंडारे यांनी ही कारवाई केली. त्यांच्यासोबतील पोलीस नाईक सुनील पटेल व किशोर अवणकर हे होते.

 नागपूर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shops are open during curfue