पाऊस आला, पेरणीही सुरू, तरी शेतकरी चिंतित, काय असावे कारण...

Shortage of other fertilizers including urea in Yavatmal district
Shortage of other fertilizers including urea in Yavatmal district

यवतमाळ : मॉन्सूनचे आगमन झाल्याने जिल्ह्यातील शेतकरी आपल्या शेतात पेरणी करताना दिसत आहेत. मात्र, पेरताना बियाण्यांबरोबर पिकांच्या वाढीसाठी युरियाची व इतर खतांचीही आवश्‍यकता असते. म्हणून कृषिकेंद्रांवर खत खरेदीसाठी गेले असता, त्यांना युरिया व इतर खत न मिळाल्याने कृषी केंद्रांवर खतांचा तुटवडा असल्याचे पाहायला मिळत आहे.

जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी आता पेरणीला सुरुवात केली आहे. कापूस, सोयाबीन, हळद आदी पिकांसह इतर पारंपरिक पिकांची पेरणी करताना त्यांच्या योग्यवाढीसाठी युरियाची व इतर खतांची गरज असते. मात्र, कृषिकेंद्रांवर युरियासह इतर खत उपलब्ध नसल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. त्यामुळे पेरणीदरम्यान युरियाची गरज असताना कृषिकेंद्र चालकांकडे युरियाचा साठा उपलब्ध नसल्याने युरियासह खत घेण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांना रिकाम्या हातांनी परतावे लागत आहे.

दरम्यान, लॉकडाउनमुळे कृषी केंद्रांवर गर्दी होऊ नये, म्हणून कृषी विभागाने शेताच्या बांधावर खते व बियाणे पोहोचविण्याचे संगितले होते. त्यामुळे शेत जवळजवळ असणाऱ्या शेतकऱ्यांनी एकाच कृषी केंद्रांवर संपर्क करून बियाणे व खत शेताच्या बांधावर बोलावले होते. कृषी केंद्रावरून बियाणे वाहनांद्वारे शेताच्या बांधांवर पोहोचले खरे. परंतु, खत न आल्याने शेतकरी चिंतित आहेत. कृषी विभागाच्या बैठकीत शेतीसाठी लागणारे बी-बियाणे, खाते यांचा तुटवडा भासू देणार नाही, असे आश्वासन देण्यात आले होते. परंतु, त्या आश्वासनाची पूर्ती होत नसल्याचे शेतकऱ्यांकडून बोलले जात आहे. याबाबत कृषिकेंद्रचालकांना विचारले असता, आम्ही खत व युरियाचा साठा नसल्याची महिती कृषी कार्यालयाला दिली असल्याचे त्यांनी संगितले.

बियाण्यांच्या वाढीबाबत शंका

शेतकऱ्यांच्या बांधावर बियाणे व खते पोहोचवू, असे कृषी विभागाने संगितले होते. आम्ही चार ते पाच शेतकऱ्यांनी मिळून दिग्रसच्या कृषी केंद्रावरून बियाणे व खत बोलाविले होते. बियाणे व खत कृषी केंद्रावरून शेतात आणणाऱ्या वाहनाचे भाडे आम्हा शेतकऱ्यांनाच द्यायचे होते. परंतु, कृषी केंद्रावर खत व युरिया उपलब्ध नसल्याने आता आम्हाला खत वाहतुकीचा खर्च वाढणार आहे. त्यामुळे आम्हाला आर्थिक भुर्दंडही पडणार आहे. शिवाय लवकर खत न मिळाल्यास आम्ही पेरणी केलेल्या बियाण्यांची योग्य वाढ होईल की नाही, याबाबत शंका आहे. पिकांची योग्यवाढ न झाल्यास उत्पन्नातही घट होणार आहे.
- विठ्ठल चतरू राठोड, शेतकरी, कळसा (जि. यवतमाळ).
 

दोन-चार दिवसांत उपलब्ध होईल
गेल्या अडीच महिन्यांपासून लॉकडाउनमुळे सर्वत्र वाहतूक बंद होती. त्यामुळे युरिया व खतांचा माल आला नव्हता. खरीप हंगामाच्या पेरणीला सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांकडून युरिया व खतांची मागणी वाढली आहे. युरिया व इतर खतांची टंचाई असल्याचे जिल्हाधिकारी यांना कळविले आहे. येत्या दोन-चार दिवसांत युरिया व इतर खत कृषी केंद्रांवर उपलब्ध होईल.
-अर्जुन जाधव, तालुका कृषी अधिकारी, दिग्रस (जि. यवतमाळ)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com