esakal | लसींचा तुटवडा अन्‌ म्हणे लसीकरण वाढवा; केंद्रीय आरोग्य पथकाचा सल्ला

बोलून बातमी शोधा

Shortage of vaccines and Central Health Commission team said increase vaccination Yavatmal news

सर्वच खासगी कोविड रुग्णालये खचाखच भरली आहेत. उपजिल्हा रुग्णालयात तयार केलेले डेडिकेटेड कोविड केअर सेंटर व आसारपेंड आश्रमशाळेतील कोविड केअर सेंटरवर कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत.

लसींचा तुटवडा अन्‌ म्हणे लसीकरण वाढवा; केंद्रीय आरोग्य पथकाचा सल्ला
sakal_logo
By
दिनकर गुल्हाने

पुसद (जि. यवतमाळ) : वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली येथील केंद्रीय आरोग्य पथकाने शनिवारी (ता. १०) पुसद येथील उपजिल्हा रुग्णालयास भेट दिली. यावेळी या पथकाने ‘लसीकरण वाढवा’ असा सल्ला दिला. मात्र, या लसीकरण केंद्रात शुक्रवारपासून लस उपलब्ध नसल्याने लसीकरण थांबले आहे, याकडे आरोग्य पथकाचे लक्ष वेधण्यात आले.

पथकात केंद्रीय आरोग्य विभागाच्या सहायक संचालक डॉ. आरती बहल व राम मनोहर लोहिया वैद्यकीय महाविद्यालयाचे सहायक प्राध्यापक डॉ. देवेन भारती यांचा समावेश होता. त्यांनी कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. येथील सर्वच खासगी कोविड रुग्णालये खचाखच भरली आहेत. उपजिल्हा रुग्णालयात तयार केलेले डेडिकेटेड कोविड केअर सेंटर व आसारपेंड आश्रमशाळेतील कोविड केअर सेंटरवर कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत.

हेही वाचा - शिक्षणाधिकाऱ्यांचा इशारा; शाळा बंद आढळल्यास होणार कारवाई

दोन्ही केंद्रांना या पथकाने भेट दिली व येथील व्यवस्थेची पाहणी केली. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तरंग तुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार, उपविभागीय अधिकारी डॉ. व्यंकट राठोड, तहसीलदार अशोक गिते, गटविकास अधिकारी वानखडे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. हरिभाऊ फुपाटे, प्रभारी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. दिनेश चव्हाण उपस्थित होते.

...अन्‌ लसीकरण थांबले!

नागरिकांनी लसीकरणात सहभागी व्हावे व कोरोनाला दूर ठेवावे, ही प्रचार यंत्रणा एक एप्रिलपासून राबविल्यानंतर नागरिकांचे पाय लसीकरण केंद्राकडे वळलेत. मात्र, आठ एप्रिलपासून कोविशील्ड लस उपलब्ध नसल्याने लसीकरण थांबले आहे. आतापर्यंत सहा हजार २५० लसी ६५ सेशनमध्ये वापरण्यात आल्या आहेत. उपजिल्हा रुग्णालयाला एकूण कोविशील्ड सहा हजार ४८० व कोव्हक्‍सिन ७०० लसींचा पुरवठा करण्यात आला. त्यापैकी अर्बनसाठी ७८० लसी वापरण्यात आल्यात. केवळ १५० लसी वाया गेल्या. लसीकरणासाठी लसींचा तातडीने पुरवठा करण्यात यावा, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.

जाणून घ्या - आता याला काय म्हणावे! मृत शिक्षिकेमागेही कोरोना सर्वेक्षणाचे काम, एसडीओ कार्यालयाचा अजब कारभार

तालुका आरोग्य अधिकारी पॉझिटिव्ह

पुसद तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आशीष पवार हे कोरोना पॉझिटिव्ह आल्याने त्यांचा प्रभार डॉ. दिनेश चव्हाण यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. डॉ. आशीष पवार यांनी सुरुवातीपासूनच कोरोना काळात आघाडीवर काम केले आहे.