esakal | "कन्हैयालाल'च्या जयघोषाने दुमदुमली संत्रानगरी
sakal

बोलून बातमी शोधा

नागपूर : पारंपरिक आदिवासी नृत्याचे सादरीकरण करताना युवक.

"कन्हैयालाल'च्या जयघोषाने दुमदुमली संत्रानगरी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : भगवान श्रीकृष्णाचा चित्ररथ... राममंदिराची प्रतिकृती... जालीयनवाला बाग हत्याकांडातील शहिदांचे स्मरण... गोपिकेसह श्रीकृष्णाच्या वेशभूषेने नटलेले चिमुकले... हाथी-घोडा पालखी, जय कन्हैयालाल की... जय श्रीराम.. अशा जयघोषाने संत्रानगरी दुमदुमली. निमित्त होते गोरक्षण सभेतर्फे आयोजित श्रीकृष्ण जन्मोत्सव शोभायात्रेचे.
धंतोली येथील गोरक्षण सभेच्या परिसरातून रविवारी दुपारी भगवान श्रीकृष्णाच्या मूर्ती पूजनाने शोभायात्रेला सुरुवात झाली. शोभायात्रेचे हे 37 वे वर्षे होते. राधेसह श्रीकृष्णाची मूर्ती, अयोध्येतील राममंदिराची प्रतिकृती, जालीयनवाला बाग हत्याकांडाला शंभर वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त शहिदांचे स्मरण करणाऱ्या मुख्य चित्ररथासह एकूण 41 चित्ररथांनी शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले होते. शिवमुद्रा ढोल पथकाच्या ढोलवादनाने आसमंत दणाणून सोडला. हिंदू संस्कृती व परंपरा दर्शविणारे चार आखाडेसुद्धा शोभायात्रेमध्ये सहभागी झाले होते. धंतोलीमधील गोरक्षण सभेच्या परिसरातून शोभायात्रेची सुरुवात झाली. जनता चौक, पंचशील चौक, राणी झाशी चौक, लोखंडी पूल, कॉटन मार्केटमार्गे मार्गस्थ होत गीता मंदिरात नंदोत्सवाने शोभायात्रेचा समारोप करण्यात आला.

loading image
go to top