
महाराष्ट्रात थेट निवडून आलेल्या नगराध्यक्षांवर अशी कारवाई होण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार खळबळ उडाली आहे. याविषयी पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली.
महाराष्ट्रात थेट निवडून आलेल्या नगराध्यक्षांवर अशी कारवाई होण्याची ही पहिलीच वेळ; काय आहे प्रकार?
दर्यापूर (जि. अमरावती) : पालिकेच्या नगराध्यक्षांना नगरविकास मंत्रालयाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. १५ दिवसांत स्पष्टीकरणासह जबाब दाखल करण्यास सांगितले आहे. याप्रकारामुळे दर्यापूर नगरपरिषद वर्तुळात खळबळ उडाली आहे.
नगरपालिकेच्या सदस्यांनी ऑगस्ट २०१९ मध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती. या संबंधात जिल्हाधिकारी यांनी केलेली चौकशी तथा अहवाल नगरविकास मंत्रालयाकडे पाठविण्यात आला होता. त्यानुसार सादर पत्र नगराध्यक्षांना पाठविण्यात आले आहे. पत्रामध्ये नमूद बाबीत चौकशीत वरील आरोपात तथ्य आढळून आले असल्याने १५ दिवसांत याविषयी स्पष्टीकरण देण्याचे सांगण्यात आले आहे.
महाराष्ट्रात थेट निवडून आलेल्या नगराध्यक्षांवर अशी कारवाई होण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार खळबळ उडाली आहे. याविषयी पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली. यावेळी उपाध्यक्ष सागर गावंडे, किरण गावंडे, नीलिमा पाखरे, राजकन्या चव्हाण, अनिल बागडे, ईबादुल्ला शहा, शादातखॉं पठाण, प्रतिभा शेवणे यांची उपस्थिती होती.
१२ नगरसेवकांनी तक्रार दिली
पालिकेतील अनेक लोकोपयोगी विषयांवर सभा न घेता चर्चा न करणे, अनेक मुद्दे थंडबस्त्यात ठेवणे आदी विषयांबाबत आम्ही १२ नगरसेवकांनी तक्रार दिली होती. यावर चौकशी करून नगरविकास मंत्रालयाने नगराध्यक्षांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
- अनिल बागडे,
स्थायी समिती सदस्य, दर्यापूर
स्वतःहून राजीनामा द्यावा
पालिकेत अनेक विषय जाणूनबुजून बाजूला ठेवत विकासाकामांना त्रासदायक वातावरण तयार झाले आहे. कारणे दाखवा नोटीस येणे पालिकेत प्रथमच घडले आहे. आता नगराध्यक्षांनी नैतिक जबाबदारी धरून स्वतःहून राजीनामा द्यावा.
- सागर गावंडे,
उपाध्यक्ष, दर्यापूर
कायदेशीर सल्ला घेऊन स्पष्टीकरण देऊ
नगराध्यक्षांचे कार्य विकासात्मक आहे, कोणाचाही वेगळा हस्तक्षेप नाही, कारणे दाखवा नोटीसमध्ये अंतर्भूत आरोप राजकीय भावनेने प्रेरित आहेत, आम्ही याविषयी कायदेशीर सल्ला घेऊन स्पष्टीकरण देऊ, न्याय न मिळाल्यास न्यायालयात दाद मागू,
- असलम घाणिवाले,
गटनेता, भाजप
Web Title: Show Cause Notice Mayor Amravati
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..