Shravan Putrada Ekadashi : पुत्रदा एकादशी निमित्त शेगावात भाविकांची गर्दी

ऑगस्ट महिन्यातील चौथ्या शनिवार, रविवार सुट्टी असल्याने लागोपाठ दोन दिवस शासकीय कार्यालय व बॅकेला सुट्या
Shravan Putrada Ekadashi devotees at Shegaon for darshan of Shri Sant Gajanan Maharaj
Shravan Putrada Ekadashi devotees at Shegaon for darshan of Shri Sant Gajanan MaharajSakal

शेगाव : महिन्यातील चौथ्या शनिवार रविवार दोन दिवस सुट्टी आणि पुत्रदा एकादशी निमित्ताने शेगाव येथे श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. ऑगस्ट महिन्यातील चौथ्या शनिवार, रविवार सुट्टी असल्याने लागोपाठ दोन दिवस शासकीय कार्यालय व बॅकेला सुट्या आहेत.

लागोपाठ आलेल्या दोन दिवसाच्या सुट्ट्या मुळे त्याचप्रमाणे मुला-मुलींना शाळा कॉलेज सुट्टी असल्यामुळे शेगाव येथील श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनाकरिता बाहेरगावावरून शेकडो खाजगी वाहनाने, राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसेस तसेच रेल्वेने प्रवास करून हजारो भाविक संतनगरी शेगावात पोहोचले व त्यांनी पहाटे पाच वाजता पासून श्रींच्या मंदिरात दर्शनाकरिता एकच गर्दी केली होती.

तब्बल तीन तास रांगेत उभे राहून अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने व श्रद्धेने याचप्रमाणे श्रींच्या मंदिरातील नियमांचे शिस्तीचे काटेकोरपणे पालन करीत हजारो भाविकांनी दर्शन घेऊन फराळ महाप्रसादाचा लाभ घेतला.

याचप्रमाणे अनेक भाविकांनी श्री दासगणू महाराज रचीत श्री गजानन विजय ग्रंथ मधील २१ अध्यायाचे मोठ्या श्रद्धेने पारायण केले. दोन दिवस लागोपाठ सुट्ट्या असल्याने शेगाव मंदिर परिसर भाविकांनी फुलून गेलेले दिसत होते

ऑटो चालकांचा बेशिस्तपणा

शेगाव मंदिराजवळील परिसरात बेशिस्तपणाची हद्द झाली असून रस्त्याच्या मधोमध लावण्यात येणारी दुकाने व ऑटो उभे करून प्रवाशांची वाट पाहत उभे असलेले ऑटोचालक यामूळे या भागातून भाविकांना धड चालणेही कठीण होत आहे.

तसेच यामूळे वाहतूकीस प्रचंड अडथळा निर्माण होतो. वास्तविकत: उच्च न्यायालयाच्या आदेशावरून हा चौक पार्किंगसाठी मनाई करण्यात आलेली आहे. तसा सुचना फलकही या चौकात लावण्यात आलेला आहे.

मात्र न्यायालयाच्या आदेशाची याठिकाणी सर्रास पायमल्ली होतांना दिसून येते अंमलबजावणीची जबाबदारी पोलीस दल व नगर परिषद प्रशासनावर सोपविण्यात आलेली आहे. मात्र या दोन्ही विभागाकडून याठिकाणी आदेशाचे राखण करण्याची कार्यवाही होताना दिसून येत नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com