Gajanan Maharaj Temple : श्रींच्या मंदिरात आजपासून श्रीरामनवमी उत्सव
Ram Navami 2025 : शेगाव येथील श्री संत गजानन महाराजांच्या मंदिरात श्रीराम नवमी उत्सवाची सुरुवात ३० मार्चपासून विविध धार्मिक कार्यक्रमांमधून होत आहे. लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या या मंदिरात मोठ्या धूमधामात उत्सव सुरू आहे.
शेगाव : देशभरातील लाखो भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या संतनगरी शेगाव येथील श्री संत गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये दरवर्षीप्रमाणे श्रीराम नवमी उत्सव कार्यक्रमास आज ता.३० मार्चपासून विविध धार्मिक कार्यक्रमांनी प्रारंभ होत आहे.