श्री संत रूपलाल महाराज पालखीचे दानापूर येथे स्वागत

सुनिलकुमार धुरडे
बुधवार, 27 जून 2018

दानापूर (अकोला) : आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथे होणाऱ्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी श्रीक्षेत्र अंजनगावसुर्जी येथुन श्री संत रूपलाल महाराज पालखीचे पंढरपूर कडे प्रस्थान झाले .या पालखीचे दानापूर नगरीत मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले.                    

यावेळी संत रूपलाल महाराज बारी युवा संघटना, माजी महाराज उत्सव समिती, आझाद गणेशोत्सव मंडळा,गांधी चौक ,जगदंबा चौक,येथे पदाधिकाऱ्यसह गावकऱ्यांनी पालखीचे मोठ्या उत्साहाने स्वागत केले. हिच व्हावी माझी आस, जन्मोजन्मीचा तुझा दास, पंढरीचा वारकरी, चुको न दे वारी या अभंगात विणा, टाळ, मूदुंगाच्या निनादात विठठूनामाचा गजर करीत होते. हातात टाळ घेऊन पावल्या खेळाडू होते.

हातात भगव्या पताका घेऊन भक्ती रसात रममाण झाले होते. या पालखीचे ठिक ठिकाणी मोठ्या आनंदात स्वागत करण्यात आले. यावेळी विविध संघटनांनी चहा,बिस्किट,फराळाचे वाटप यावेळी केले. सायंकाळी संत रूपलाल महाराजांची पालखी नागवेली चौकात दाखल झाली. यावेळी या ठिकाणी पंजाबराव भुते यांच्या हस्ते पालखीचे पुजन व महाआरती करण्यात आली .यावेळी पालखीत सहभागी भाविकांसाठी जीवनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .नंतर हरि कीर्तन करण्यात आले .दुसर्या दिवशी पालखीचे वाडगाव वान मार्गे, बावनबिर, वरवट एकलारा, वानखेड कडे प्रस्थान झाले .                       

Web Title: shri ruplal maharaj palakhi enters in danapur