Pandharpur Wari : ‘श्रीं’च्या पालखीने घेतला विदर्भाचा निरोप; श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान
Shri Sant Gajanan Maharaj palkhi : श्री संत गजानन महाराज यांची पालखी विदर्भातील शेवटच्या मुक्कामानंतर पंढरपूरकडे रवाना झाली आहे. पालखीला भावपूर्ण निरोप देण्यात आला, आणि शेकडो भाविक उपस्थित होते.
रिसोड : विदर्भातील शेवटचा मुक्काम करून श्री संत गजानन महाराज यांची पालखी पंढरपूरकडे रवाना झाली आहे. आज सकाळी पाच वाजता शेकडोंच्या संख्येने श्री संत गजानन महाराज यांना भावपूर्ण निरोप देण्यात आला. आठ जून रोजी पालखीचे वाशीम जिल्ह्यात आगमन झाले होते.