VIDEO : याला म्हणतात विश्वास! सात महिलांनी 'बाळू'साठी केला सरपंचपदाचा त्याग

seven candidate not filed application for sarpanch in chunala grampanchayat of chandrapur
seven candidate not filed application for sarpanch in chunala grampanchayat of chandrapur

राजुरा (जि. : चंद्रपूर) : निवडणूक म्हणजे आर्थिक घोडेबाजार मग ती लोकसभेची असो की, ग्रामपंचायतीची निवडणूक. मतदारांना आपल्याबाजूने मतदान करण्यासाठी कोणत्याही मार्गाचा अवलंब होत असतो. मात्र, राजुरा तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून नावलौकीक असलेल्या चुनाळा ग्रामपंचायत येथील शुक्रवारी झालेल्या सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडणुकीत 13 सदस्य म्हणून निवडून आलेल्या सदस्यांपैकी सात महिलांनी सरपंच पदासाठी एकही अर्ज सादर केला नाही. त्यामुळे उपसरपंच पदासाठी एकमेव बाळनाथ वडस्कर उर्फ 'बाळू' यांची बिनविरोध निवड झाली. सत्तेसाठी वाटेल ते करणाऱ्या राजकीय वातावरणातील वेगळा आदर्श निर्माण करणारी चंद्रपूर जिल्ह्यातील ही एकमेव घटना आहे.

चुनाळा येथील जनतेनी या निवडणुकीत माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्या मार्गदर्शनाखाली बाळनाथ वडस्कर यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवीत येथील जनतेनी एकतर्फी कौल देत 13 पैकी 13 उमेदवार निवडून दिले. आम्हाला बाळू हाच सरपंचपदी पाहिजे, असा आग्रह निवडून आलेल्या महिलांनी धरला होता. मात्र, सरपंच पदाचे आरक्षण हे महिला राखीव निघाल्याने नागरिकांचा प्रशासनाप्रति रोष निर्माण झाला व पाचशे महिला पुरुष तहसिलवर धडकून ताहासिलदारांना सरपंचपदाचे आरक्षण बदलविण्यासंबंधी निवेदन दिले. परंतु, प्रशासनाकडून काहीच बदल न झाला नाही. बाळू यांच्यावर ग्रामस्थांचा विश्वास असल्याने चुनाळावासीयांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले.

चुनाळा गावात कोणत्याही ग्रामपंचायतीच्या मालकीचे विश्रामगृह असून सात एकरच्या परिसरात सागवान वृक्ष आहे. अशी एकूण करोडो रुपयाची संपत्ती आहे. ग्रामपंचायतीचे पहिले सचिवालय तयार करून गावातील सर्व कार्यालये पोस्ट ऑफिस, तलाठी कार्यालय, बँक, ग्रामपंचायत त्या इमारतीत आहे. स्वतंत्र सभागृह असून गावातील सामाजिक कार्यक्रम व वैक्तिक कार्यक्रम करण्याची सोय आहे. गावात पाण्याचा मुबलक पुरवठा व्हावा यासाठी तीन पाण्याच्या टाक्या आहेत. शेतात जाण्यासाठी पाणंद रस्त्याची सुविधा असून याच विकास कामावर विश्वास ठेवीत काम करण्याऱ्या माणसालाच सरपंचपदी रुजू करण्याचा निर्णय जनतेनी घेतल्याने बाळू व ग्रामपंचायत सदस्य संतोषी निमकर, जया निखाडे, उषा करमणकर, संतोषी साळवे, अर्चना आत्राम, कोमल काटम, वंदना पिदूरकर, दिनकर कोडापे, राजू कीनेकर, राकेश कार्लेकर, रवी गायकवाड, सचिन कांबळे यांचे गावातील नागरिकांनी अभिनंदन केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com