व्हाट्सअपच्या माध्यमातून एकत्र आली भावंडे

'hivarkhed bhavand
'hivarkhed bhavand

हिवरखेड  :  येथील आणि तळेगाव सोमेश्वर येथे लहानपणी सोबत खेळलेली संपूर्ण बजाज कुटुंबियातली अनेक भावंडे कालांतराने विविध ठिकाणी स्थायिक झाले. मुलींचे लग्न होऊन त्यांच्या संसारात गुंतल्या. कौटुंबिक कार्यक्रमातही सख्या भावंडा व्यतिरिक्त इतर बहीण-भावांचे वर्षानुवर्षे आपसात भेट होत नव्हती. निदान व्हाट्सअपच्या माध्यमातून बजाज परिवाराच्या सर्व बहीण-भावांची आणि कुटुंबियांची नाळ कायम जुळलेली रहावी या उद्देशाने एडमिन ज्योती चिरानिया यांनी काही वर्षांपूर्वी बजाज फॅमिली, ब्रदर्स अँड सिस्टर्स नावाचे व्हाट्सअप ग्रुप बनवून सर्व भावंडांना एकत्रित जोडले.

हेही वाचा - पतीच्या उपचारासाठी जिंकली होती मॅरेथॉन स्पर्धा!
संतनगरीत स्नेहमिलन सोहळा
अल्पावधीतच ग्रुपमध्ये सर्वांची रुची वाढत गेली. सर्वांचे सुख-दुःख वाटल्या जाऊ लागले. ग्रुपमुळे सर्व भावंडांची आपुलकी, आत्मीयता वाढीस लागली.
व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून जोडलेल्या सर्व बहीण-भावांनी त्यांच्या कुटुंबियांसह एकत्र भेटावे आणि स्नेहमिलन सोहळा व्हावा अशी चर्चा सुरू झाली. त्यानुसार संतनगरीत स्नेहमिलन सोहळा घेण्याचे ठरले. आणि आनंदाने पारही पडला. यासाठी हरदा-मध्यप्रदेश, हिवरखेड, तळेगाव सोमेश्वर, तेल्हारा, आकोट, अकोला, शेगाव, बोरगाव मंजू, चांदुर बाजार, मलकापूर, वाशीम, मेहकर, अंबड, जालना, औरंगाबाद, पुणे यासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सर्व ग्रुप सदस्य आणि त्यांचे कुटुंबीय असे जवळपास १०० ते १५० जण एकत्र आले.


खेळीमेळीच्या वातावरणात कार्यक्रम पार पडला
संत श्री गजानन महाराजांच्या दर्शनानंतर एका हॉटेलमध्ये कार्यक्रमाची रुपरेषा ठरवली. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ग्रुप सदस्यांचा सत्कार करण्यात आला. सर्वांनी आपल्या अंगी असलेले कलागुण मंचावर सादर केले. यावेळी अनेकांना आपले आनंदाश्रू आवरणे कठीण झाले होते. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात कार्यक्रम पार पडला.


क्लिक करा - पालकमंत्र्यांची अकोला जिल्ह्यात राजकीय मोट
सामाजिक बांधिलकी जोपासली

बजाज कुंटुंब, ब्रदर्स अँड सिस्टर्स ग्रुपच्या कार्यक्रमात सामाजिक बांधिलकीवर विशेष भर देण्यात आला. यावेळी विविध सदस्यांनी ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’, ‘दुल्हन ही दहेज है’, ‘पर्यावरण व निसर्ग संरक्षण’, ‘लोकसंख्या नियंत्रण’ इत्यादी अनेक महत्त्वपूर्ण सामाजिक विषयांवर संबोधन करण्यात आले आणि जनजागृती करीत सर्व मुद्द्यांवर सकारात्मक प्रयत्न करण्याची ग्वाही दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com