दोन सख्ख्या भावांच्या मृत्यूने हळहळले शेलू, अशी घडली घटना

drown
drown

आर्णी (जि. यवतमाळ) : पाणी पिण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या भावंडाचा विहिरीत पडून मृत्यू झाला. ही ह्दयद्रवक घटना बुधवारी (ता.15) सकाळी सात वाजता दरम्यान तालुक्यातील शेलू येथे उघडकीस आली. बकर्‍या चारायला जाणे दोन भावंडाच्या जिवावर बेतल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. 

ईश्‍वर सूर्यकांत देवकर (वय 14) व किशोर सूर्यकांत देवकर (वय 11, दोघेही रा. शेलू), अशी मृतांची नावे आहेत. दोघेही मंगळवारी (ता. 14) सकाळी आपल्या शेतात बकर्‍या चारण्यासाठी गेले होते. दररोज दुपारी बारा वाजेपर्यंत दोघेही घरी परत येतात. काल मात्र बकर्‍या घरी आल्या. पण दोघेही भावंड परत आले नाही. त्यामुळे कुटुंबीय चिंतेत पडले. बराच उशीर होऊन ईश्‍वर व किशोर घरी न परतल्याने नातेवाइकांनी सर्वत्र शोध घेतला. अखेर आज सकाळी सात वाजता दरम्यान त्यांच्याच शेतात खोदलेल्या विहिरीत दोघांचे मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आले. 

बकर्‍या चारायला जाणे बेतले जीवावर
या घटनेची माहिती मिळताच आर्णी पोलिस ठाण्याचे कर्मचारी व्यंकटेश मच्छेवार, अक्षय ठाकरे यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. दोन्ही पुतणे पाणी पिण्यासाठी विहिरीवर गेले असताना, पाण्यात पडून त्यांचा मृत्यू झाला, अशी फिर्याद श्रीराम नारायण देवकर (वय 35) यांनी पोलिसांत दिली. त्यावरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. त्यांच्या पश्‍चात आई, वडील, दोन बहिणी असा आप्त परिवार आहे. या घटनेमुळे शेलू गावावर शोककळा पसरली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com