esakal | 'सिकल सेल'च्या रुग्णांना धोका, उपचारासाठी शेजारच्या राज्यात पायपीट
sakal

बोलून बातमी शोधा

sickle cell patients facing problems in sironcha of gadchiroli

मानवी शरीरातील लाल रक्तपेशीची वाढविण्यासाठी सिकसेलग्रत आजारग्रस्त रुग्णांसाठी उपचार आहेत. मात्र, रुग्णांसाठी तालुक्‍यातील एकही रुग्णालयात उपचार सुविधा उपलब्ध नाही व रक्तपेढीची योग्य सुविधा शासन व प्रशासनाने उपलब्ध करून दिली नाही.

'सिकल सेल'च्या रुग्णांना धोका, उपचारासाठी शेजारच्या राज्यात पायपीट

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सिरोंचा ( जि. गडचिरोली ) : आदिवासीबहुल नक्षलग्रस्त भागातील सिरोंचा तालुक्‍यातील अनेक ग्रामीण भागातील सिकलसेल रुग्णांसाठी योग्य उपचार सुविधा नाही. त्यामुळे येथील रुग्णांची हेळसांड होत आहे.

हेही वाचा - भाजपकडून महापालिका निवडणुकीची जोरदार तयारी, अर्थसंकल्पात नागपूर मेट्रोसाठी ५ हजार ९७६ कोटी

मानवी शरीरातील लाल रक्तपेशीची वाढविण्यासाठी सिकसेलग्रत आजारग्रस्त रुग्णांसाठी उपचार आहेत. मात्र, रुग्णांसाठी तालुक्‍यातील एकही रुग्णालयात उपचार सुविधा उपलब्ध नाही व रक्तपेढीची योग्य सुविधा शासन व प्रशासनाने उपलब्ध करून दिली नाही. या रुग्णांचे जीव धोक्‍यात आले आहेत. हा आनुवंशिक आजार अनेकांचे आयुष्य कमी करतो. या व्यक्तींना नेहमीच औषधासाठी शेजारील तेलंगणा राज्याच्या वरंगल, चेन्नुर येथे जावे लागत आहे. सिरोंचा तालुक्‍यात योग्य उपचार, योग्य वेळेत पूर्ण प्रमाणात मिळत नसल्याने रुग्ण अडचणीत येत आहेत. यातील अनेक रुग्णांना नियमित रक्ताची गरत असते. त्यांच्या शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी होत असल्याने किंवा कमी झाल्याने रुग्ण वेळोवेळी आजारीच पडत असतो. कित्येक रुग्ण गरीब असून त्यांना मोफत वैद्यकीय उपचारासाठी कुठे दखल करावे, हेच अद्याप कळू शकले नाही. त्यामुळे आरोग्य विभागाने सिकलसेलग्रस्तांना नियमित औषधोपचार व ज्यांना सतत रक्ताची गरज पडते अशा रुग्णांना वेळोवेळी रक्त उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी येथील सिकलसेल रुग्ण व त्यांचे नातलग करत आहेत. 

हेही वाचा - मन सुन्न करणारी घटना : आई-वडिलांनी टोकाच्या निर्णयात मुलीलाही घेतले सोबत; जड मनाने घेतली नदीत उडी

विशेष म्हणजे सिरोंचा तालुका ग्रामीण रुग्णालयात असलेली रक्तपेढी कुचकामी ठरली आहे. त्यामुळे तालुक्यातील सिकलसेल रुग्णांना मोफत वैद्यकीय उपचारासाठी कुठे दाखल करावे, हा प्रश्‍न निर्माण झाला आहे. दरवर्षी, जिल्हा आरोग्य विभागासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध असतो. मात्र, सिकलसेलसाठी जे कर्मचारी कार्यरत होते त्यांना कामावरून काढून ते काम आशासेविकांना देण्यात आले आहे. त्यामुळे येथील कर्मचाऱ्यांनाही कामावर घेऊन सिकलसेलसंदर्भातील सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी होत आहे.
 

loading image