esakal | बुधवारपासून पाऊस वाढण्याची चिन्हे
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

बुधवारपासून पाऊस वाढण्याची चिन्हे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अमरावती : येत्या बुधवार (ता. 28) पासून विदर्भात पाऊस वाढण्याची चिन्हे आहेत.
जिल्ह्यात तीन-चार दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. अधूनमधून पावसाच्या हलक्‍या सरी कोसळत आहेत. पावसाळी वातावरण निर्माण होत आहे. ओडिशा किनारपट्टीवर 7.5 किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे व कमी दाबाचे क्षेत्र आहे. कमी दाबाचे क्षेत्र दक्षिणेकडे झुकलेले आहे. ते वायव्येस म्हणजे मध्य भारतातून पुढे सरकण्याची शक्‍यता आहे. पूर्व विदर्भावरील चक्राकार वारे ओडिशा किनारपट्टीवरील हवामान प्रणालीमध्ये मिसळलेले आहे. त्याच्या प्रभावामुळे विदर्भात काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची शक्‍यता आहे. विदर्भात रविवारी बरेच ठिकाणी पावसाची शक्‍यता आहे. त्याचप्रमाणे पश्‍चिम मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरातमध्ये रविवार ते मंगळवारदरम्यान मुसळधार तसेच विदर्भात बुधवारी (ता. 28) बऱ्याच ठिकाणी पाऊस होईल. 29 ते 31 ऑगस्टदरम्यान पावसात वाढ होईल, अशी शक्‍यता श्री शिवाजी कृषी महाविद्यालयातील हवामानशास्त्र विभागप्रमुख डॉ. अनिल बंड यांनी व्यक्त केली.

loading image
go to top