शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी सिंदखेड राजा येथे आगळं-वेगळं आंदोलन; 'या' मागण्यांचं निवेदन केलं सादर

मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी तालुक्यातील व शहरातील शेतकऱ्यांनी आगळे-वेगळे लोटांगण आंदोलन केले. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.
Sindkhed Raja
Sindkhed Raja esakal

सिंदखेड राजाः मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी तालुक्यातील व शहरातील शेतकऱ्यांनी आगळे-वेगळे लोटांगण आंदोलन केले. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.

यापूर्वी वेळोवेळी मागणी, निवेदने, मोर्चे, उपोषण करुनही प्रशासनाने त्यावर कोणत्याही प्रकारची अंमलबजावणी केली नव्हती. त्यामुळे शहरातील सामाजिक कार्यकर्ते कैलास मेहेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांनी तहसील कार्यालय ते उपविभागीय अधिकारी कार्यालयापर्यंत लोटांगण आंदोलन केले. सोमवार, दि. २९ जानेवारी रोजी हे आंदोलन करण्यात आले. यावळी आंदोलकांनी तहसीलदार सचिन जैस्वाल यांना निवेदन दिले. प्रशासन आतातरी शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देणार का? याकडेच लक्ष लागले आहे.

Sindkhed Raja
Mumbai Crime News : पाच महिलांशी विवाह करणाऱ्या 'लखोबा लोखंडे'ची उच्च न्यायालयाने काढली वरात

आंदोलकांच्या मागण्या

  • तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात आंदोलकांनी म्हटले आहे की, नगर परिषदे अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेचा चौथा हप्ता लाभार्थ्यांना गेल्या तीन वर्षापासून मिळाला नाही. त्यामुळे लाभार्थ्यांवर उपासमारीची व गाव सोडून मजुरी करण्याची वेळ आली आहे. तरी घरकुल अनुदानाचा थकीत चौथा हप्ता तात्काळ मिळावा.

  • तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे तालुक्यात दुष्काळ घोषित झाला असून शासनाने शेतकऱ्यांना विविध दुष्काळी सवलती लागू केल्या आहेत. परंतु बँकांनी पीक कर्ज वसुली सुरू केली आहे. त्यामुळे शासनाच्या विविध अनुदानाच्या रकमेला बँका होल्ड लावत आहेत.

  • शेतकऱ्यांना पीक कर्ज भरण्याचा तगादा लावला जातोय. रब्बी हंगामात तालुक्यातील शेतकन्यांचे अतिवृष्टी, गारपीट आणि चक्रीवादळामुळे मंजूर झालेल्या पीक नुकसानीची मदत वितरीत करावी.

  • शेडनेडधारक व बिजोत्पादक शेतकऱ्यांना स्वतंत्रपणे मदत द्यावी. खरीप हंगामात वन्य प्राण्यांनी केलेल्या नुकसानीच्या तक्रारीचा मोबदला अजूनही शेतकऱ्यांना मिळाला नाही, तो तात्काळ मिळावा.

आयुष्यमान भारत योजना, नमो शेतकरी सन्मान योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना व इतर योजनांचा लाभ व नवीन नोंदणी तहसील स्तरावर सुरू कराव्यात. शेतकऱ्यांच्या प्रलंबित नवीन वीज जोडण्या, सोलार फिटींग तात्काळ मंजूर करुन व मंजूर झालेल्या जोडण्या तात्काळ जोडाव्यात.

  • शेतकऱ्यांना पिक कर्जासाठी सिबिलची अट रद्द करावी व नियमीत कर्जदार शेतकऱ्यांना मागील प्रोत्साहनपर अनुदान तात्काळ द्यावे, नगर परिषदेअंतर्गत सर्व विकास कामांचे कंत्राट स्थानिक सुशिक्षित बेरोजगार किंवा बचतगटांना द्यावेत.

  • शहरातील खोदकाम झालेले सर्व रस्ते तात्काळ दुरुस्त करावे. यासह इतर मागण्या तात्काळ पूर्ण करण्यासाठी सिंदखेड राजा तहसिल कार्यालय ते उपविभागीय कार्यालय लोटांगण आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनामध्ये तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता.

विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते कैलास मेहेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली लोटांगण आंदोलन करण्यात आले. या आगळ्या-वेगळ्या लोटांगण आंदोलनामुळे नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com