Mumbai Crime News : पाच महिलांशी विवाह करणाऱ्या 'लखोबा लोखंडे'ची उच्च न्यायालयाने काढली वरात

पाच महिलांशी विवाह करणाऱ्या नवरदेवाची मुंबई उच्च न्यायालयाने चांगलीच वरात काढली आहे. याप्रकरणी अटक होऊ नये, म्हणून रायगडमधील नवरदेवाने उच्च न्यायालयात अर्ज केला होता. मात्र न्या. सारंग कोतवाल यांनी नवरदेवाचा जामीन अर्ज फेटाळून लावला.
Mumbai Crime News
Mumbai Crime Newsesakal

मुंबई : पाच महिलांशी विवाह करणाऱ्या नवरदेवाची मुंबई उच्च न्यायालयाने चांगलीच वरात काढली आहे. याप्रकरणी अटक होऊ नये, म्हणून रायगडमधील नवरदेवाने उच्च न्यायालयात अर्ज केला होता. मात्र न्या. सारंग कोतवाल यांनी नवरदेवाचा जामीन अर्ज फेटाळून लावला. शांतिलाल खरात असे त्या नवरदेवाचे नाव आहे.

तक्रारदार महिलेची खरातशी मॅट्रोमोनियल साईटच्या माध्यमातून ओळख झाली. त्यानंतर त्याने दोन महिन्यांत लग्न केले. लग्नानंतर खरातने ७ लाख रुपये घेतले तसेच वेगवेगळे दागिने गहाण ठेवून तब्बल ३२ लाख रुपयांचे कर्जही मिळवले.

आरोपीने किमान पाच महिलांशी लग्न केले असून त्यातील दोन महिलांच्या मुलांच्या जन्म प्रमाणपत्रावर पिता म्हणून त्याचे नाव आहे, असा दावा करीत तक्रारदार महिलेच्या वकिलांनी त्यासंदर्भातील कागदपत्रे सादर केली.

Mumbai Crime News
Nitish Kumar : नितीश कुमार NDA मध्ये गेले पण इंडिया आघाडीकडे आहे प्लॅन बी; काँग्रेस 'यांच्या' संपर्कात

तसेच २००८ ते २०१८ या कालावधीत घेतलेल्या घटस्फोटांच्या प्रक्रियेची माहिती देण्यात आली. याप्रकरणी अटक होऊ नये, यासाठी नवरदेवाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावर न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या समोर सुनावणी घेण्यात आली.

अर्जदाराने यापूर्वी अनेक महिलांशी लग्न केले आणि ही धक्कादायक बाब लपवून ठेवल्याचे उपलब्ध पुराव्यांवरून स्पष्ट होत आहे. अशा परिस्थितीत त्याला अटकपूर्व जामीन मंजूर करता येणार नाही, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने आरोपीचा अर्ज फेटाळला.

Mumbai Crime News
Fatwa Issued Against Imam : राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थिती, मुस्लिम धर्मगुरूविरोधात फतवा जारी

वरील प्रकरण आचार्य अत्रेंच्या 'तो मी नव्हेच' या नाटकाशी मिळतंजुळतं आहे. नाटकात प्रभाकर पणशीकरांनी 'लखोबा लोखंडे' हे पात्र साकारलं होतं. नाटकातला लखोबा अशीच महिलांची फसवणूक करुन त्यांच्याशी लग्न करायचा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com