Forest officials monitor tiger movements in Sindewahi after two people died in separate tiger attacks within two days.
esakal
सिंदेवाही (चंद्रपूर), : सिंदेवाही तालुक्यात पट्टेदार वाघाच्या हल्ल्यांत दोन दिवसांत दोघांचा मृत्यू झाला. पळसगाव (जाट) येथे शेतकरी नानाजी नारायण कामडी (वय ५५) यांचा शनिवारी, तर भेंडाळा येथे अंगणवाडीसेविका प्रेमीला पुंडलिक महाडोरे (वय ५६) यांचा रविवारी (ता. २५) वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला.