
सिंदखेड राजा : तालुक्यामधील ६६ हजार १३०.१६ हेक्टर वरील जमिनीवर पेरणी होणार असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी गोपाल बोरे यांनी दैनिक ‘सकाळ’ सोबत बोलताना दिली आहे. सर्वाधिक सोयाबीन पिकाची ३८ हजार १९ हेक्टर पेरणी होणार असून, कापुस पिकांची पेरणीचे १९ हजार ४६७ हेक्टर नियोजन करण्यात आले आहे.