Uddhav Thackeray : गद्दारीचा अंकुर महाराष्ट्रामध्ये रुजू देणार नाही

गद्दारीचा अंकुर महाराष्ट्रमध्ये रुजू देणार नसल्यांचे प्रतिपादन शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे आयोजित जनसंवाद मेळाव्यामध्ये केले.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeraysakal

सिंदखेड राजा - गद्दारीचा अंकुर महाराष्ट्रमध्ये रुजू देणार नसल्यांचे प्रतिपादन शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे आयोजित जनसंवाद मेळाव्यामध्ये केले आहे. राजे लखोरीराव जाधव यांच्या राजवाड्यासमोर आगमन झाल्यानंतर ते राष्ट्रमाता राजमाता माँ जिजाऊ च्या जन्मस्थाळावर जावून नतमस्तक झाले.

यावेळी विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार संजय राऊत, आमदार नितीन देशमुख, सचिव मिलींद नार्वेकर, जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत, जिल्हा संपर्कप्रमुख प्रा.नरेंद्र खेडेकर, सहसंपर्कप्रमुख छगनराव मेहेत्रे, आमदार नितीन देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.

जनसंवाद मेळाव्यामध्ये बोलतांना उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, शिवसेनेचे हिंदुत्व हे राष्ट्रीत्व आहे. शिवसेनेचे हिंदुत्व म्हणजे हृदयात राम व हाताला काम हे आहे. आमचे हिंदुत्व घरामध्ये चूल पेटवणारे आहे, भाजपाचे हिंदुत्व हे घर पेटवणारे हिंदुत्व आहे. शिवसेना एक पक्ष नसून तो विचार आहे, याची पाळेमुळे खूप खोलवर रुजली आहेत, ती खणायला गेलेल्यांचे अस्तित्व संपेल असे सांगून ठाकरे यांनी जिजाऊ जन्मस्थळ भेट नाही तर येथे येणे माझे कर्तव्य असल्याचे म्हटले.

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, मोदी आणि शहा जोडी आपल्या देशात हुकूमशाही आणू पाहत आहे. रशियात ज्याप्रमाणे पुतीन यांनी विरोधकांना स्वतःच्या बाजूने घेतले तर जे यायला तयार नाही त्यांना तुरुंगात डांबले. काहींचा संशयास्पद मृत्यूही झाला. काहींना तर देशाच्या बाहेर तडीपार देखील केले. अगदी अशीच परिस्थिती आपल्या देशात आणून आपल्या स्वातंत्र्यावर घाला घालण्याची नीती भाजपकडून अवलंबिल्या जात आहे.

खतांच्या पोत्यावर मोदींचे फोटो असल्याची खिल्ली उडवतांना सार्वजनिक सुलभ शौचालयावर देखील मोदींचे फोटो टाका म्हणजे शौचालयात जाणाऱ्यांचे सर्व सुलभ होईल असे सांगितले. यावेळी शिवसेनेचे तसेच महाविकास आघडाची नेते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सरकारचे मातृतिर्थाकडे दुर्लक्षच

मातृतीर्थ सिंदखेड राजाकडे सध्याच्या सरकारचे दुर्लक्ष असल्याची टीका विधान परिषद विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी केली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतांना मातृतीर्थच्या विकासाची योजना आखली होती. परंतु सद्या याकडे दुर्लक्ष पहायला मिळत आहे. पुढे म्हणाले की, परिसरातील शेतकरी सद्या मेटाकुटीला आला आहे.

मागील काही महिन्यांपूर्वी अवकाळी व गारपीटने मोठे नुकसान झाली आहे. परिसरात बीज उत्पादनचे नुकसान झाले होते. सीडनेटचा विषय विधिमंडळामध्ये मांडला असल्याने यावेळी सांगितले. मातृतीर्थ शेगांव भक्तीमार्गाचे काम हे दलाल साठी असल्याचे टीका त्यांनी केली.

गुजरात मध्ये औरंगजेब जन्माला आला

छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र मध्ये जन्माला आले तर औरंगजेब हा गुजरातला जन्माला आला आणि हीच औरंगजेबी वृत्ती शिवसेनेवर चाल करून येत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने स्थापन झालेली शिवसेना त्या शिवसेनेचे निर्माते बाळासाहेब ठाकरे आहेत. तीच शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पुढे घेवुन जात आहे. त्यामुळे यादराखा महाराष्ट्रावर चाल करुन येवू नका. शिवसेनेचे दोन दुकडे केले ते यासाठी केले कारण महाराष्ट्रामध्ये स्वाभिमानी मराठी माणसाला संपावयाचे असल्याची टीका त्यांनी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com