Amaravati : चिखलदरात सहा महिन्यांत ८६ बालमृत्यू

तीन मातांचाही मृत्यू; कुपोषण निर्मूलनात अपयश
कुपोषण
कुपोषण sakal media

चिखलदरा (अमरावती) : मेळघाटात दरवर्षी शेकडो बालके मृत्यूच्या दाढेत जात आहेत. १९९१ पासून हजारो बालकांनी जगाचा निरोप घेतला आहे. चिखलदरा तालुक्यात सहा महिन्यांत ८६ बालमृत्यू झाले आहेत. मेळघाटचा विचार केल्यास त्यात अधिक वाढ झालेली दिसून येईल.

कुपोषण
"वानखेडे मोदींच्या पुढचे निघाले"; घड्याळ, शर्ट-पँटबाबत नवाब मलिकांचा नवा दावा

चिखलदरा तालुक्यात एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांत ८६ बालके कुपोषित होऊन त्यांचा मृत्यू झाला. तर, तीन मातांचाही या काळात मृत्यू झाला असल्याची नोंद शासनदरबारी आहे. हा आकडा फक्त चिखलदरा तालुक्यातील आहे. शासनाने कुपोषण निर्मूलनासाठी कोट्यवधी रुपयांची उधळण केली आहे. मात्र, अजूनही आदिवासी बांधवांची परिस्थिती लक्षात घेतली तर तशीच आहे. मेळघाटात मंत्री, अधिकारी, पदाधिकारी यांचे दौरे होऊनही काही फायदा झाला नाही किंवा होताना दिसत नाही. कुपोषणामुळे ३४ उपजत मृत्यू, तर शून्य ते सहा वर्षे वयोगटातील ५२ बालमृत्यू झालेत.

कुपोषण
'हॉटेलचं फुटेज दिलं, तर तोंड दाखवायला...', मलिकांचा फडणवीसांवर गंभीर आरोप

चिखलदरा तालुक्यात ५ प्राथमिक आरोग्यकेंद्रे, २ ग्रामीण रुग्णालये, ३९ उपकेंद्रे, ३ प्राथमिक आरोग्यपथके, ३ फिरती पथके, १ आयुर्वेदिक दवाखाना, १० भरारी पथके, २६० दाई, १६४ आशा, १७ प्रवर्तिका, १ तालुका समूह संघटक अशा मोठ्या लवाजम्यासह शेकडो अधिकारी व पदाधिकारी मेळघाटात कार्यरत आहेत. असे असतानाही मेळघाटात दरवर्षी शेकडो बालकांचा मृत्यू होतो, ही शोकांतिका आहे.

"काटकुंभ, टेम्ब्रूसोंडा, सेमाडोह या प्राथमिक आरोग्यकेंद्र परिसरात मागील वर्षीपेक्षा जास्त बालमृत्यू झाले. यावेळी न्यूमोनिया, जंतुसंसर्ग जास्त प्रमाणात होता. तसेच प्रत्येक मूल जन्म व्हायच्या आधी दोन वर्षांचे अंतर असायला पाहिजे. परंतु, त्याकडे आदिवासी बांधव लक्ष देत नाहीत. तसेच कमी वयात लग्न केले जातात. यामुळे बालमृत्यूचे प्रमाण वाढते."

-डॉ. दिलीप रणमले, जिल्हा आरोग्य अधिकारी

"दोन महिन्यांतच जास्त प्रमाणात बालमृत्यूचा आकडा वाढला. कारण, कमी वजनाची बालके जास्त जन्माला आली. तसेच यादरम्यान काळात स्थलांतर जास्त प्रमाणात झाल्यामुळे मातांना पोषण आहार संदर्भसेवा उपलब्ध होऊ शकली नाही. त्यामुळे बालमृत्यूचा आकडा वाढला."

-डॉ. सतीश प्रधान, तालुका आरोग्य अधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com