महिला बाथरूममध्ये गेली असताना त्याच वेळी कुणीतरी लहान दीड महिन्याच्या मुलाला घरातून पळवून नेले. महिला रूममध्ये आली असता तिला तिचे दीड महिन्याचे बाळ दिसले नाही. या घटनेची माहिती तिने वडिलांना दिली. वडील चव्हाण घरी परत आले.
अमरावती : शहरातील न्यू प्रभात कॉलनीतील आपल्या माहेरी आलेल्या महिलेच्या अवघ्या दीड महिन्याच्या चिमुकल्याचे घरातून अपहरण झाले. भर दुपारी दीड वाजताच्या सुमारास रविवारी (ता. २९) ही घटना घडली. नातेवाईकांच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमरावती ग्रामीण पोलिस दलातील सहायक पोलिस उपनिरीक्षक चव्हाण यांची विवाहित मुलगी प्रसूतीसाठी अमरावतीत आली होती. तिने एका मुलाला जन्म दिला. महिलेचे आई-वडील एका समारंभासाठी बाहेर गेले होते. घटनेच्या वेळी भाऊ एका खोलीत टीव्ही बघत होता. महिला मुलासह दुसऱ्या खोलीत होती.
महिला बाथरूममध्ये गेली असताना त्याच वेळी कुणीतरी लहान दीड महिन्याच्या मुलाला घरातून पळवून नेले. महिला रूममध्ये आली असता तिला तिचे दीड महिन्याचे बाळ दिसले नाही. या घटनेची माहिती तिने वडिलांना दिली. वडील चव्हाण घरी परत आले.
सविस्तर वाचा - व्हॉट्सॲपमुळे पसरली प्रेमसंबंधाची माहिती; बदनामीच्या भीतीने तरुणीची आत्महत्या
त्यांनी राजापेठ ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. भरदुपारी दीड महिन्याच्या मुलाचे अपहरण कुणी व कशासाठी करावे. याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. उशिरा रात्रीपर्यंत बाळाचा शोध लागू शकला नाही.
संपादन - नीलेश डाखोरे