

Maharashtra Snake Bite Tragedy Brother Dies Sister Critical After Snake Bite Incident Leaves Wagholi Village in Shock
sakal
अमरावती : नांदगावपेठ नजीकच्या व माहुली जहाँगीर हद्दीत राहणाऱ्या बहीण-भावाला एकाचवेळी पाच दिवसांपूर्वी सर्पदंश झाला. त्यापैकी भावाचा शनिवारी (ता. १२) उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, बहिणीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती गंभीर आहे.पवन अरुण चव्हाण (वय ९, रा. वाघोली), असे मृत मुलाचे नाव असल्याची माहिती माहुली जहाँगीरचे ठाणेदार प्रकाश पाटील यांनी दिली.