Snakebite: नागपंचमीच्या दिवशीच सर्पदंशाच्या सलग चार घटना; जयपूर, म्हसनी, भडशिवणी आणि शेलुवाडा परिसर हादरले
NagPanchami2025: नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर कारंजा तालुक्यात जयपूर, म्हसनी, भडशिवणी व शेलुवाडा भागात चार सर्पदंशाच्या घटना घडल्या. सुदैवाने सर्वांना वेळीच रुग्णालयात दाखल करण्यात आले.
कारंजा : एकीकडे नागपंचमीच्या दिवशी नागोबा मंदिरात नागाची पूजा सुरू असताना दुसरीकडे दोघांना सर्पदंश झाल्याच्या घटना घडल्या. यातील पहिली घटना कारंजा तालुक्यातील जयपूर येथे घडली. तर दुसरी घटना तालुक्यातील म्हसनी येथे घडली.