
कोदामेंढी (मौदा) : ग्रामीण भागात साप चावल्यास त्या व्यक्तीस गावातील मंदिरात नेऊन बाऱ्या म्हणून विष उतरविण्याची पद्धत सुरवातीला होती. आताही काही आदिवासी ग्रामीण भागात ती पद्धत असली तरी त्यानंतर त्यास वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात नेले जाते. बाऱ्या म्हणून विष उतरविणे आणि त्यांनी दिलेली जडीबुटी खाऊन रुग्ण बरा झाल्याचे प्रमाण फारच नगण्य आहे.