
साळवाः कुही तालुक्यात पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्पदंशाच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या असून जुलै महिन्यात आतापर्यंत एकूण १६ रुग्ण सर्पदंशाची प्रकरणे झाली. मात्र, आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार मृत्यूंची नोंद शून्य आहे. ही माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दिनेश चकोले यांनी दिली आहे.