कोविड योध्दयाची कमाल! कोरोनावर केली यशस्वी मात आणि कोविडमुक्त जनजागृती लढ्यात झाले सामील  

आनंद चलाख 
Sunday, 4 October 2020

राजुरा तालुक्यात कोविड मुक्त महाराष्ट्र अभियान अंतर्गत "माझे कुटुंब,माझी जबाबदारी" अभियानांतर्गत शहरी व ग्रामीण भागात कोवीड सर्वेक्षण सुरू आहे

राजुरा (जि. चंद्रपूर) : कोरोना पासून बचाव करण्यासाठी महाराष्ट्रत कोवीड मुक्त महाराष्ट्र अभियान सुरू आहे . प्रत्येक कुटुंब सुरक्षित राहण्यासाठी जनजागृती अभियान सुरू आहे. मात्र शहरातील काही वार्डात सर्वेक्षणासाठी आलेल्या टीमला सहकार्य मिळत नव्हते. लोकांचे गैरसमज दूर करण्यासाठी तहसीलदार डॉक्टर रवींद्र होळी यांनी समाजसेवकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत खुद्द कोरोना आजारातून दुरुस्त झालेले काँग्रेसचे सक्रिय समाजसेवक अशोकराव हे जनजागृती लढ्यात सहभागी झाले आहेत व शासकीय पथकासोबत मिळुन ते मार्गदर्शन करीत आहेत. यामुळे अनेक वार्डातील अनेक कुटुंब तपासणीसाठी पुढे सरसावले आहे.

राजुरा तालुक्यात कोविड मुक्त महाराष्ट्र अभियान अंतर्गत "माझे कुटुंब,माझी जबाबदारी" अभियानांतर्गत शहरी व ग्रामीण भागात कोवीड सर्वेक्षण सुरू आहे.  प्रत्येक कुटुंब सुरक्षित राहण्यासाठी प्रशासनाने कंबर कसलेली आहे. यासाठी प्रशासनाने तीन लोकांची टीम नियुक्त केलेली आहे. या माध्यमातून प्रत्येक कुटुंबातील व्यक्तींची विचारपूस व त्यांची माहिती जाणून घेण्यात येते. शिवाय प्रत्यक्षात ऑक्सीमीटर व तापमापी च्या साह्याने प्रत्येक सदस्यांची तपासणी करण्यात येत आहे. 

सविस्तर वाचा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात पोलिसांत तक्रार; जनतेची फसवणूक केल्याचा आरोप

शहरातील काही वॉर्डांमध्ये तपासणी पथकास सहकार्य मिळाले नाही. त्यानंतर तहसीलदार डॉक्टर रवींद्र होळी यांनी वार्डातील कुटुंबीयांच्या जनजागृतीसाठी समाजसेवकांना पुढे येण्याचे आवाहन केले. त्या अनुषंगाने करून आजारातून नुकतेच बरे झालेले काँग्रेसचे सामाजिक कार्यकर्ते अशोकराव हे स्वतः जनजागृती लढ्यात सहभागी झालेले आहेत. राजुरा शहरातील सोनिया नगर वार्डात मोठ्या प्रमाणावर मजूर लोक असतात. 

या वॉर्डातून अनेक ठिकाणी तपासणी पथकास कुटुंबातून विरोध झालेला होता. कोरोना आजाराबाबत अनेक गैरसमज काही लोकांमध्ये असल्यामुळे तपासणी करण्यासाठी आलेल्या सदस्यांना सहकार्य करीत नसल्याची तक्रार होती. शहरातील प्रत्येक कुटुंब सुरक्षित राहण्याच्या दृष्टीने व कोरोना आजाराबाबत जनजागृती होण्यासाठी पथकांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने प्रत्यक्ष कोरोना आजारातून नुकतेच बरे झालेले तालुका काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ता अशोकराव जनजागृती लढ्यात उतरले आहेत व  आपले अनुभव कुटुंबासोबत शेअर करीत आहेत. 

लोकांच्या मनातील शंका व गैरसमज यांना दूर करण्यासाठी प्रत्येक कुटुंबातील सदस्यांना समजावून सांगत आहेत. शिवाय कोरोना पासून आपल्या कुटुंबाचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येकाने काळजी घेण्याचे आव्हान करीत आहेत. त्यांच्या आवाहनाला येथील कुटुंब चांगला प्रतिसाद देत आहेत. यामुळे शासनातर्फे नियुक्त केलेल्या तपासणी पथकाला दिलासा मिळालेला आहे. 

कोरोना संकटाच्या कालखंडात समाजातील प्रत्येक व्यक्तीला योग्य माहिती मिळावी आणि प्रत्येक कुटुंब कोरोणा पासून सुरक्षित राहावे यासाठी प्रशासनाला सहकार्य करीत असल्याचे मनोगत अशोकराव याने सकाळ'शी बोलताना व्यक्त केले. विशेष म्हणजे या अगोदर लाकडावून कालखंडामध्ये अडकलेल्या प्रवाशांना मदत करण्यात पुढाकार घेतल्यामुळे सामाजिक कार्यकर्ता अशोक राव यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्यामुळे प्रशासनातर्फे त्यांना कोरोणा योद्धा म्हणून सन्मानित करण्यात आलेले होते.

जाणून घ्या - अंडी, चिकनमध्येच नाही तर या दहा गोष्टीतूनही मिळते प्रोटीन; जास्त ताकदीसाठी करा सेवण

कोरोना पासून बचाव करण्यासाठी कोवीडमुक्त महाराष्ट्र अभियान सुरू आहे. त्या अंतर्गत प्रशासनातर्फे प्रत्येक कुटुंबाचे सर्वेक्षण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे .मात्र शहरातील काही वार्डातील नागरिकांमध्ये कोरोना बाबत गैरसमज असल्यामुळे तपासणी पथकाला सहकार्य होत नसल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर प्रत्येक कुटुंबाला योग्य माहिती मिळविण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांना आव्हान करण्यात आले होते.या अनुषंगाने कोरोनतून दुरुस्त झालेले अशोकराव हे या लढ्यामध्ये सहभागी झालेले आहेत व लोकांचे मतपरिवर्तन करीत आहेत. त्यांचे मनापासून अभिनंदन!  कोविड मुक्त देश करण्यासाठी लोकजागृती अभियानात इतर सामाजिक कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावेत.
- डॉक्टर रवींद्र होळी,
 तहसीलदार, राजुरा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: social worker Ashok rao doing awareness work of corona