esakal | अंडी, चिकनमध्येच नाही तर या दहा गोष्टीतूनही मिळते प्रोटीन; जास्त ताकदीसाठी करा सेवण
sakal

बोलून बातमी शोधा

not only chicken but also these ten things provide protein read full story

शुद्ध शाकाहारी लोकांची मोठी अडचण होत आहे. ते अंडी आणि चिकन खास नसल्याने भीती वाटत आहे. मात्र, घाबरण्याचे काहीही कारण नाही. अशा लोकांसाठी आम्ही घेऊन येत आहोत खालील गोष्टी. त्याचे सेवन केल्याने त्यांच्या शरीरातील प्रोटीन वाढण्यास मदत होईल. या पदार्थांचे सेवन केल्याने आरोग्य सांभाळण्यास मदतही होते.

अंडी, चिकनमध्येच नाही तर या दहा गोष्टीतूनही मिळते प्रोटीन; जास्त ताकदीसाठी करा सेवण

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नागपूर : सध्या देशात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. दिवसागणिक रुग्णसंख्या वाढत असून, मृतांचाही आकळा फुगत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे रुग्णालयात रुग्णांना बेड्स मिळणे कठीण झाले आहे. कित्येकांचा उपचाराअभावी मृत्यू होत आहे. यामुळे नागरिकाच्या मनात चांगलीच भीती निर्माण झाली आहे. दुसरीकडे कोरोनावर अद्याप ओषध सापडलेली नाही. यामुळे रुग्णांना रोगप्रितीकार शक्ती वाढवण्यासाठी व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, चिकन आणि अंडी खाण्याचा सल्ला दिला जात आहे. यामुळे अंडी आणि चिकनच्या मागणीत चांगलीच वाढ झाली आहे. दुसरा पर्याय नसल्याने नागरिक हे घेत आहे. मात्र, अशा दहा वस्तू आहेत ज्यामध्ये अंडे आणि चिकनपेक्षा जास्त ताकद आणि प्रोटीन आहेत... चला तर जाणून घेऊया याबद्दल...

कोरोनाने प्रत्येकांच्या मनात भीती निर्माण केली आहे. कधी आपल्याला कोरोनाची लागण होईल आणि आपला मृत्यू होईल अशी भीती सतावत आहे. यामुळे अनेकांनी घराबाहेर निघणे बंद केले आहे. काही मात्र बिनदास फिरत आहेत. जणू त्यांना कोरोना होणारच नाही. सद्या कोरोनावार मात करण्यासाठी आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासठी अंडी आणि चिकन खाण्याचा सल्ला दिला जात आहे.

अधिक माहितीसाठी - पोलिसानेच केला घटस्फोटित प्रेयसीवर बलात्कार, मुख्यालयातून अटक

मात्र, शुद्ध शाकाहारी लोकांची मोठी अडचण होत आहे. ते अंडी आणि चिकन खास नसल्याने भीती वाटत आहे. मात्र, घाबरण्याचे काहीही कारण नाही. अशा लोकांसाठी आम्ही घेऊन येत आहोत खालील गोष्टी. त्याचे सेवन केल्याने त्यांच्या शरीरातील प्रोटीन वाढण्यास मदत होईल. या पदार्थांचे सेवन केल्याने आरोग्य सांभाळण्यास मदतही होते.

ओट्स : काही वर्षांपासून ओट्सच्या वापरामध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. त्यातील सर्वात मोठे कारण म्हणजे त्यात केवळ प्रोटीनच नव्हे तर निरोगी फायबर, मॅग्नेशियम, मॅंगनीझ, थायमिन, व्हिटॅमिन बी एक आणि बऱ्याच गोष्टींचे पोषक घटक देखील आहेत. अर्ध्या कप कच्च्या बार्लीमध्ये १३ ग्रॅम प्रथिने असतात ज्यात ३०३ कॅलरी असते.

जाणून घ्या - नागपूरात सुरू आहे कोव्हॅक्‍सिन लसीचा प्रयोग!

पनीर : पनीरमध्ये काही अंशी फॅट आणि कॅलरीचा समावेश असतो. परंतु, त्यात प्रोटीन भरपूर असतात. याशिवाय हे कॅल्शियम, फॉस्फरस, सेलेनियम व्हिटॅमिन बी १२, राइबोफ्लेविन आणि इतर अनेक पौष्टिक पदार्थांनी परिपूर्ण आहे. २२६ ग्रॅम चीजच्या कपात १९४ कॅलरीसह २७ ग्रॅम प्रोटीन असू शकतात.

ग्रीक योगर्ट : ग्रीक दही एक प्रकारचे दही आहे. ते चविष्ट आहे. त्यात बरेच पौष्टिक पदार्थ आहेत. फॅट नसलेल्या ग्रीक दह्यामध्ये ४८ टक्के प्रोटीन असतात. जर आपण असे गृहित धरले की १७० ग्रॅममध्ये १७ ग्रॅम प्रोटीन आहेत. ज्यामध्ये केवळ शंभर कॅलरी असतात. म्हणूनच हे दही प्रोटीनसाठी एक उत्तम उपाय आहे.

सविस्तर वाचा - अचानक का कमी झाली कोरोना बाधितांची संख्या? अतिशय धक्कादायक कारण आले समोर

ब्रोकोली : ब्रोकोली जीवनसत्व सी, व्हिटॅमिन के, फायबर आणि प्रथिनेयुक्त अशी एक आरोग्यदायक भाजी आहे. ब्रोकोली ही विविध बायोएक्टिव्ह पोषक तत्वांचा संग्रह आहे. जी कर्करोगापासून बचाव करण्यास मदत करते. त्यात इतर भाज्यांपेक्षा बऱ्याच जास्त प्रमाणात प्रोटीन आहेत. म्हणजे चिरलेल्या ब्रोकोलीच्या ९६ ग्रॅममध्ये तीन ग्रॅम पप्रोटीन असू शकतात. ज्यामध्ये केवळ ३१ कॅलरी असतात.

क्विनोआ : क्विनोआचे बिज सध्या जगातील सर्वात लोकप्रिय सुपर फूड पदार्थांपैकी एक आहे. हे बऱ्याच जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबरचे मुख्य स्त्रोत आहे. तसेत त्यामध्ये अँटिऑक्सिडंट्सचा साठा आहे. शिजवलेल्या क्विनोआच्या एका कपात २२ ग्रॅम कॅलरीचे १८५ ग्रॅम आणि ८ ग्रॅम प्रोटीन असतात.

हेही वाचा - भरचौकात हत्या झालेल्या गुंडाच्या अंत्यसंस्काराला उसळली हजारोंची गर्दी; नागपुरात गॅंगवॉर भडकण्याची शक्यता

शेंगदाणे : शेंगदाण्यांमध्ये भरपूर प्रोटीन असतात. शंभर शेंगदाण्यांमध्ये २४ ग्रॅम प्रोटीन आढळतात. शंभर ग्रॅम कोंबडीमध्ये केवळ १५ ते १६ ग्रॅम प्रोटीन आढळतात. आता आपण अशी तुलना करू शकतो की अधिक शक्तिशाली काय आहे मांस की शेंगदाणे.

बदाम : सकाळी रिकाम्या पोटी बदामाचे सेवन केल्याने शरीरात भरपूर प्रोटीन व इतर पौष्टिक पदार्थ मिळतात. ज्यामुळे शरीर मजबूत बनते.

भिजवलेला हरभरा-चणे : शंभर ग्रॅम भिजवलेल्या हरभरा खाल्ल्याने शरीराला पन्नास ग्रॅम प्रोटीन मिळाते जे चिकनपेक्षा दुप्पट आहे. आता लोकांना कोण समजावणार की यात चिकनपेक्षा जवळपास दुप्पट प्रोटीन आहे. म्हणून सकाळी भिजवलेला हरभरा रिकाम्या पोटी खावा.

अधिक वाचा - आता शंभर सेकंदात कापता येणार अपघातग्रस्त रेल्वे डबा

राजमा : राजमा प्रोटीनने समृद्ध आहे. राजमाची भाजी, राजमा सूप पिल्यामुळे शरीरातील प्रोटीनचे प्रमाण कोंबडीपेक्षा कितीतरी पटीने जास्त असते. म्हणजेच या गोष्टींचे नियमित सेवन करून तुम्हाला प्रोटीनची कमतरता भासणार नाही.

संकलन आणि संपादन - नीलेश डाखोरे