esakal | जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात विदर्भाच्या पुत्राला वीरमरण
sakal

बोलून बातमी शोधा

 Soldier from Vidarbha killed in terror attack in Jammu and Kashmir

जम्मू-काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात गोंदियाचे जवान नरेश उमराव बडोले (वय ४९) शहीद झाले आहेत. केंद्रीय राज्य राखीव दलाच्या (सीआरपीएफ) ११७ बटालियनमध्ये ते कार्यरत होते.

जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात विदर्भाच्या पुत्राला वीरमरण

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नागपूर : काश्‍मीरमधील बडगाम जिल्ह्यात मोटारसायकलवरून आलेल्या दहशतवाद्यांनी गुरुवारी केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या पथकावर गोळीबार केला. यात ‘सीआरपीएफ’चे सहाय्यक उपनिरीक्षक नरेश उमराव बडोले हे हुतात्मा झाले. ते मूळचे विदर्भातील गोंदियाचे होते. सध्या त्यांचे कुटुंब नागपूरात राहते. हल्‍ल्यानंतर दहशतवाद्यांनी त्यांची बंदूक हिसकावून घेतल्याचे समजते.
 
बडगाममधील कैसरमुल्ला भागात‘सीआरपीएफ’च्या ११७ व्या तुकडीवर सुरक्षा पथकावर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याचे पोलिसांनी सांगितले. यात बडोले जखमी झाले. त्यांना विशेष उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. हल्‍ल्यानंतर पलायन करणाऱ्या दहशतवाद्यांनी बडोले यांची बंदूक हिसकावून नेली. या घटनेनंतर हल्लेखोरांच्या शोधासाठी पोलिसांनी संपूर्ण परिसर ताब्यात घेतला. 

मन सुन्न! चुली पेटल्याचं नाहीत; गावातील मुलांच्या बाबतीत घडलेली हृदयद्रावक घटना बघून हळहळले अख्खे गाव
 

जम्मू-काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात गोंदियाचे जवान नरेश उमराव बडोले (वय ४९) शहीद झाले आहेत. केंद्रीय राज्य राखीव दलाच्या (सीआरपीएफ) ११७ बटालियनमध्ये ते कार्यरत होते. जम्मू काश्मीरमधील बडगाव जिल्ह्यात आज झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचा एक जवान गंभीर जखमी असल्याचे वृत्त होते. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाल्याची माहिती मिळाली आहे.

गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी तालुक्यातील बाम्हणी हे बडोले यांचे मूळ गाव. २४ एप्रिल १९७१ रोजी जन्मलेले बडोले १९८९ मध्ये सीआरपीएफला रुजू झाले होते. आज दहशतवादी हल्ल्यात शत्रूशी लढताना बडोले यांना वीरमरण आलं. बडगम जिल्ह्यातील छदुरा परिसरात गस्तीवर असताना त्यांच्या पथकावर सकाळी पावणे आठच्या सुमारास दहशतवादी हल्ला झाला. मोटरसायकलवरून आलेल्या दहशतवाद्यांनी बडोले यांच्या पथकाच्या दिशेनं अंदाधुंद गोळीबार केला. यावेळी उडालेल्या धुमश्चक्रीत बडोले गंभीर जखमी झाले. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी बडगाम जिल्ह्यातील कॅसरमुल्लामध्ये सीआरपीएफच्या ११७ व्या बटालीयनमधील एका जवानावर गोळी झाडली. जखमी बडोले यांची रायफल घेऊन दहशतवाद्यांनी पळ काढला. बडोले यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दहशतवाद्यांनी फायरिंग केलेला परिसर सील करण्यात आला असून, दहशतवाद्यांचा तपास सुरू आहे. नरेश बडोले नागपूर येथे राहणारे असून विवाहित आहेत. त्यांच्या जाण्याने कुटुंबीयांवर मोठा आघात झाला आहे. अंत्यसंस्कारासाठी त्यांचे पार्थिव नागपूरला आणण्यात येणार असल्याचे समजते.

संपादन  : अतुल मांगे 

loading image