का कोमेजत चाललीये "लाजाळू'?... वाचा

chandrapur ayurvedic plant
chandrapur ayurvedic plant

चंद्रपूर :  पूर्वी गावाच्या सभोवताल अनेक औषधी वनस्पती असायच्या. या औषधी वनस्पतींच्या वापराने अनेक छोटे-मोठे आजार पटकन बरे व्हायचे. त्यातीलच एक लाजाळू. अतिशय नाजूक असलेल्या लाजाळूच्या रोपट्याला हात लावलं की ते आपोआपच पाने मिटवून घेते. त्यामुळेच या वनस्पतीची "लाजाळू' अशी ओळख आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत प्रदूषण, मानवी हस्तक्षेपामुळे "लाजाळू' कोमेजली असून ही औषधी वनस्पती दुर्मिळ होत चालली आहे.


काही वर्षांपूर्वी गावाशेजारी, शेताच्या परिसरात लाजाळू, सांढेवाल, खंडूचक्का, अक्कल काढा, मंजिष्ठा यासह अन्य औषधी वनस्पती मोठ्या प्रमाणावर आढळून येत होत्या. या औषधी वनस्पतींचा उपयोग छोट्या-मोठ्या व्याधींवर केला जायचा. या औषधी वनस्पतींचे गुण लक्षात त्यांच्याकडून नागरिकही याचे संवर्धन करीत होते. मात्र, गेल्या काही वर्षांत हे चित्र बदलले आहे. लाजाळूसह अन्य औषधी वनस्पती दुर्मिळ होत चालल्याचे आयुर्वेदतज्ज्ञांचे म्हणणे आहे. ग्रामीण भागात शेत असलेल्या जागेवर आता फ्लॉट पडले. शेतीच्या जागी आता मोठ-मोठ्या इमारती बनल्या. वृक्षांची कत्तल मोठ्या प्रमाणावर करण्यात येत असल्याने पर्यावरणाचा समतोलही बिघडत चालला आहे. उद्योगांमुळे प्रदूषण वाढले. या सर्व घटकांमुळे लाजाळू व अन्य औषधी वनस्पती दुर्मिळ होत चालल्या आहेत.

- Video : यातना फाळणीच्या : बिबाबाईने पाहिली रेल्वेतून प्रेतं

अनेक आजारांवर गुणकारी; सांडेवाल, खंडूचक्का, वंशलोचनही दुर्मिळ
अनेक औषध कंपन्यांनी आता लाजाळूंचे रोपण करणे सुरू केले आहे. या कंपन्या दुर्मिळ होत चाललेल्या लाजाळू, खंडूचक्का, अक्कल काढा, मंजिष्ठ, रक्तचंदन, वंशलोचन यासारख्या वनऔषधींचे जतन करून त्यातून औषध तयार करीत आहे.


अनेक आजारांवर औषध
अतिरक्तस्त्राव थांबविणे, खोकला, पित्त, मूळव्याधीवर गुणकारी म्हणून लाजाळू या वनऔषधींचा वापर केला जातो. व्रण भरण्यासाठी खंडुचक्का या औषधी वनस्पतीचा, वाणी दोष दूर करण्यासाठी अक्कलकाढाचा उपयोग होतो. मंजिष्ठा वनऔषधीत रक्तदोष दूर करण्याचा गुणधर्म आहे; तर, बांबूच्या आत असलेल्या वंशलोचनामुळे दमा, श्‍वास, कफ दूर करता येतो, असे आयुर्वेदात सांगितले आहे.

जतन करणे आवश्‍यक
शेतीच्या जागी आता इमारती झाल्या. प्रदूषण वाढले, मानवी हस्तक्षेप वाढला. परिणामी लाजाळू, वेलवनस्पती व बऱ्याच औषधी वनस्पती दुर्मिळ होत चालल्या आहे. या औषधी वनस्पतींचे जतन करणे आवश्‍यक आहे.
- डॉ. प्रदीप आकोटकर, प्राध्यापक, वनस्पतीशास्त्र
आनंदनिकेतन महाविद्यालय वरोरा.

 

आजच्या पिढीला अनेक औषधी वनस्पतींची माहितीच नाही
पूर्वीचे लोक या औषधी वनस्पतींचे जतन करायचे. त्यांचे फायदे त्यांना ठाऊक होते. आजच्या पिढीला अनेक औषधी वनस्पतींची माहितीच नाही. त्यामुळे त्याचे संवर्धन होत नाही. या वनस्पतींचे संवर्धन होणे गरजेचे आहे.
डॉ. राजीव धानोरकर, आयुर्वेदतज्ज्ञ चंद्रपूर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com