मेळघाटातील जंगलाला आग, तीस हेक्टर सेक्टर जळून खाक

some part of melghat forest caught fire in jamali of amravati
some part of melghat forest caught fire in jamali of amravati
Updated on

जामली ( जि. अमरावती )  :  मेळघाट व्याघ्रप्रकल्पातील खोंगडा वर्तुळ अंतर्गत येणाऱ्या चार वनखंडात लागलेल्या भीषण आगीत ३० ते ४० हेक्टर जंगल जळल्याचा प्राथमिक अंदाज आहे. जामली तसेच चिखलदरा वनपरिक्षेत्रातील वनकर्मचाऱ्यांनी रात्रभर परिश्रम घेत ही आग आटोक्यात आणली. 

उन्हाळ्याचे दिवस सुरू होताच तापमान ४० अंशांपर्यंत पोहोचत आहे. त्यात मोहफुलाचा हंगाम सुरू असल्यामुळे शेतकरी झाडाखालील कचरा जाळतात. हा कचरा जाळत असताना शेजारील जंगलात आग मोठ्या प्रमाणात पसरते. परिणामी मेळघाटातील व्याघ्रप्रकल्पातील जंगलात आगी लागण्याच्या घटना दरदिवशी घडत आहेत. सदर आग ही खोंगडा वर्तुळातील वनखंड क्रमांक ९४२, ९४३, ९४९ व ९५० यामध्ये मंगळवारी दुपारी लागली होती. यात जवळपास ४० हेक्टर जंगल जळाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या आगीत मोठ्या प्रमाणात सागवान वृक्ष तसेच मौल्यवान वनसंपदा जळाली. आग विझविण्यासाठी चिखलदरा व जामली वनकर्मचाऱ्यांनी मंगळवारी रात्रभर कठोर परिश्रम घेतले. वनपरिक्षेत्र अधिकारी जामलीचे अभय चंदेल व चिखलदऱ्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी भैमुले यांच्यासोबत वनपाल सुरेश सोळंके, सचिन नवरे, वनरक्षक विजय गुलरेकर, राहुल वडे यांनी ब्लोअर मशीनच्या सहाय्याने आग विझवण्याचे काम केले.

जंगलात आग लागणे ही मानवनिर्मित असून यात  गावकऱ्यांनी वनकर्मचाऱ्यांसोबत राहून आग विझवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. जेणेकरून जंगल वाचेल. वन्यजीव पण वाचतील. ही सामूहिक जबाबदारी आपण स्वीकारली पाहिजे.
-पीयूषा जगताप, उपवनसंरक्षक, मेळघाट वन्यजीव.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com