चंद्रपुरात स्त्री सन्मान वेशीवर? महिलांकडून बळजबरीने केले जात होते हे काम..वाचा काय आहे प्रकार.. 

some people forcing women for their use in chandrapur
some people forcing women for their use in chandrapur

चंद्रपूर: स्त्रीचा सन्मान करा ही गोष्ट आपल्याला लहानपणी नेहमीच शिकवली जाते. मात्र अनेकांना मोठे झाल्यावर याचा विसर पडत जातो. स्त्री म्हणजे आपल्या इशाऱ्यावर काम करणारी बाहुली आहे असा गैरसमज अनेक लोकांचा असतो. मात्र ज्या चंद्रपुरात महाकाली मातेची पूजा केली जाते. तिथेच स्त्रीयांचा मान ठेवला जात नाही. 

चंद्रपूर शहरातून अशाच दोन घटना समोर आल्या आहेत. महिलांकडून बळजबरीने नको ते काम करून घेऊन त्यांचा छळ करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. तर पत्नीलाच बळजबरीने घृणास्पद काम करायला लावणाऱ्या नवऱ्याला आणि सासूला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.  

इमारतीतील कुंटणखान्यावर छापा 

चंद्रपूर-नागपूर मार्गावर उच्चभू लोकांची वस्ती आहे. याच वसाहतीत एका इमारतीत कुंटणखाना चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे गुरुवारी (ता. 30) रात्री रामनगर पोलिसांनी बनावट ग्राहक तिथे पाठवून देह व्यवसायाची खात्री करून घेतली. त्यानंतर पथकाने छापा टाकला. 

यावेळी एक महिला दोन युवतींना सोबत घेऊन बळजबरीने त्यांच्याकडून देह व्यवसाय करीत असल्याचा प्रकार समोर आला. पोलिसांनी तातडीने त्या महिलेस ताब्यात घेतले. तिच्यासोबत असलेल्या दोन्ही युवतींची सुटका करण्यात आली. यातील एक युवती वर्धा जिल्हा, तर दुसरी युवती मध्यप्रदेशातील आहे. 

अल्पवयीन पत्नीची बळजबरीने देहविक्री 

लग्नानंतर युवतीकडून बळजबरीने देहविक्री करण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मायलेकास अटक करण्यात आली. रामनगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत हा प्रकार उजेडात आला. सोहेल शेख या युवकाने एका अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर तिच्याशी विवाह केला. विवाहाचे काही दिवस सुखात गेले. 

त्यानंतर त्याने मुलीला देहविक्रीस करण्यास भाग पाडले. गेल्या कित्येक दिवसांपासून हा प्रकार सुरू होता. शेवटी त्या मुलीने संधी साधून रामनगर पोलिस स्टेशन गाठले. पोलिसांना सारा प्रकार सांगितला. त्यानंतर पोलिसांनी सोहेल शेख आणि त्याच्या आईवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास रामनगर पोलिस करीत आहे.  

 संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com