

Somnur Sangam
sakal
साईनाथ दुर्गम
सिरोंचा (जि. गडचिरोली) : महाराष्ट्र, छत्तीसगड व तेलंगणा या तीन राज्यांच्या सीमेवर वसलेले सोमनूर येथील गोदावरी-इंद्रावती नद्यांचे संगमस्थळ निसर्गसौंदर्याने नटलेले असले तरी मूलभूत सुविधांअभावी आजही उपेक्षित आहे. पर्यटनदृष्ट्या मोठी क्षमता असतानाही प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांचा हिरमोड होतो.