बेपत्ता 'वीर' 12 तासांत आढळला; घुग्घुस ते नागपूर प्रवासाचे गूढ गुलदस्त्यात

मनोज कनकम 
Thursday, 5 November 2020

येथील सन्नी खारकर हे प्रतिष्ठित व्यापारी आहेत. त्यांना आठ वर्षांचा वीर हा मुलगा आहे. मंगळवारी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास वीर हा दुर्गा माता मंदिर परिसरातून अचानकपणे बेपत्ता झाला.

घुग्घुस (जि. चंद्रपूर) : येथील दुर्गा माता मंदिर परिसरातून मंगळवारी अचानकपणे बेपत्ता झालेला प्रतिष्ठित व्यापारी सन्नी खारकर यांचा आठ वर्षीय मुलगा वीर हा बुधवारी नागपुरात आढळून आला. पोलिसांच्या शोध मोहिमेला यश आल्याने खारकर कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर अवघ्या 12 तासांत हास्य फुलले. मात्र, वीर हा नागपूर येथे पोहोचला कसा, हा प्रश्‍न अजूनही गुलदस्त्यात आहे.

येथील सन्नी खारकर हे प्रतिष्ठित व्यापारी आहेत. त्यांना आठ वर्षांचा वीर हा मुलगा आहे. मंगळवारी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास वीर हा दुर्गा माता मंदिर परिसरातून अचानकपणे बेपत्ता झाला. कुटुंबीयांनी सर्वत्र शोधाशोध केली. मात्र, त्याचा कुठेच पत्ता लागला नाही. 

अधिक माहितीसाठी - साहेबऽऽ आता आत्महत्या करण्याची रितसर परवानगी घेणार; पिककर्जाची अत्यंत गरज

कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यात धाव घेऊन बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनीही तातडीने तपासाची चक्रे फिरवून सर्व पोलिस ठाण्यांना बालक हरविल्याच्या सूचना दिल्या.

नागपुरातील एका पोलिस कर्मचाऱ्यालाच विमानतळालगतच्या सोनेगाव परिसरात सकाळी 6 वाजताच्या सुमारास वीर आढळून आला. तोंडाला दुपट्टा बांधून असलेल्या वीरला जवळ घेऊन सोनेगाव पोलिस ठाणे गाठले. त्यानंतर पोलिसांनी वीरकडून सर्व माहिती जाणून घेत घुग्घुस पोलिसांना माहिती देत कुटुंबीयांशी चर्चा केली. 

सविस्तर वाचा - प्रवासादरम्यान नेहमी मळमळ आणि उल्टीचा त्रास होतो? घाबरू नका पुढील उपाय नक्की करून बघा

बेपत्ता झालेला वीर आढळून आल्याने खारकर कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर हास्य उमलले. मात्र, वीर हा नागपुरात पोहोचला कसा, हा प्रश्‍न तपासातून समोर येणार आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 
  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: son of businessman found in nagpur after 12 hours