esakal | भयंकर! राग अनावर झाल्याने जन्मदात्याची मुलाकडून हत्या; तीन तासांत आरोपी ताब्यात
sakal

बोलून बातमी शोधा

son killed father in chandrapur district

कापसाची वेचणी करीत असलेली पत्नी वनिता दुपारच्या न्हारीला आपल्याला आवाज दिला नाही म्हणून ती पतीकडे आली असता घटनास्थळी जेवणाचे डब्बे इतरत्र पडलेले व रक्ताच्या खुणा दिसल्या. मुलाला आवाज देऊन पतीसंबंधी विचारणा केली असता वडिलांचा शोध घेत असल्याचा बहाना करीत वडील शेताच्या कडेला मृत अवस्थेत पडून असल्याचे आईला दाखविले.

भयंकर! राग अनावर झाल्याने जन्मदात्याची मुलाकडून हत्या; तीन तासांत आरोपी ताब्यात

sakal_logo
By
श्रीकृष्ण गोरे

राजुरा (जि. चंद्रपूर) : कोरपना तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या नांदगाव (सूर्या) येथील शंकर फोफरे (वय ४५) यांचा शनिवारी मुलगा राहुल (वय १८) याच्यासोबत सकाळी शेतात कामासाठी गेले असता वाद झाला. शाब्दिक बाचाबाचीनंतर राग अनावर झाल्याने मुलाने जन्मदात्याची विळ्याने वडिलांची हत्या केली. यानंतर मृतदेह शेताच्या बाजूला ओढत नेऊन टाकला. ही घटना दुपारी १:३० वाजताच्या सुमारास कोराडी शेतशिवारात उघडकीस आली.

शंकर यांना एकुलता एक राहुल नावाचा मुलगा आहे. पत्नी वनीतासह सुखी संसाराचा गाडा चालू होता. एक दिवस अगोदर नवीन वर्षाचे स्वागत करीत नेहमी प्रमाणे शेतीचे काम करीत होते. स्वप्नातही पोटच्या गोळ्याकडून अशी विकृत बुद्धी तयार होऊन गळा कापला जाईल असा मनात कधी विचारही केला नसेल. गावापासून दोन किमी अंतरावर असलेल्या कोराडी गावानजीक असलेल्या स्वतःच्या शेतात शंकर दररोज प्रमाणे आपल्या राहुल मुलासह काम करण्यासाठी गेला.

अधिक वाचा - पुणे- नागपूर शिवशाहीत आढळलं संशयास्पद पार्सल; चालकानं बॉक्स उघडताच सरकली पायाखालची जमीन

तूर पिकाच्या कापणीचे काम सकाळ पाळीत केल्यानंतर पत्नीने दुपारची आणलेली न्हारी करीत असताना वडील व मुलात शाब्दिक बाचाबाची झाली. मुलाला राग अनावर न झाल्याने जन्मदात्याची जवळ असलेल्या विळ्याने डोक्यात वार करीत व गळा कापून हत्या केली. रक्तबंबाळ मृत्य झालेल्या वडिलांचा मृतदेह घटनास्थळावरून काही अंतरावर कपाशीच्या पिकात ओढत नेला व मुलगा बैलाला चारा चारण्यासाठी दुसरीकडे निघून गेला.

कापसाची वेचणी करीत असलेली पत्नी वनिता दुपारच्या न्हारीला आपल्याला आवाज दिला नाही म्हणून ती पतीकडे आली असता घटनास्थळी जेवणाचे डब्बे इतरत्र पडलेले व रक्ताच्या खुणा दिसल्या. मुलाला आवाज देऊन पतीसंबंधी विचारणा केली असता वडिलांचा शोध घेत असल्याचा बहाना करीत वडील शेताच्या कडेला मृत अवस्थेत पडून असल्याचे आईला दाखविले. यानंतर पत्नी वनिताने हंबरडा फोडला. 

सविस्तर वाचा - सहा महिन्याच्या मुलीला मोठं करण्याचं 'त्याचं' होतं स्वप्नं पण अचानक अधूर झाला रस्ता अन् सगळंच संपलं

घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच परिसरातील नागरिक धावत आले. सदर घटनेची माहिती गडचांदूर पोलिसांना मिळताच नांदा येथील उपविभागीय पोलिस अधिकारी सुशीलकुमार नायक हे ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले.

जिल्हा पोलिस अधीक्षक रवींद्र साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी सुशीलकुमार नायक यांनी गडचांदूर पोलिस निरीक्षक गोपाल भारती यांच्या साहायाने घटनेची माहिती घेऊन अवघ्या तीन तासांत आरोपीला ताब्यात घेतले. घडलेल्या घटनेची माहिती राहुलला विचारली असता त्यानी गुन्ह्याची कबुली दिली. गडचांदूर पोलिस स्टेशन येथे त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

गावात हळहळ व भीतीचे वातावरण

शांत व संयमी स्वभावाने नांदगाव येथे परीचित असलेले शंकर फोफरे यांच्या हत्येने गावात हळहळ व्यक्त होत आहे. एकुलत्या एक पोटच्या मुलांकडून जन्मदात्याची हत्या झाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

विदर्भातल्या ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा

तीन तासांच्या आत आरोपी ताब्यात
कोराडी शेतशिवारात शनिवारी दुपारच्या सुमारास हत्या झाल्याची माहिती मिळाली. यानंतर घटनास्थळ गाठून जिल्हा पोलिस अधीक्षक रवींद्र साळवे यांच्या मार्गदर्शनात आरोपीचा शोध सुरू केला. गडचांदूर पोलिस निरीक्षक यांच्या मदतीने तीन तासांच्या आत आरोपीला ताब्यात घेतले.
- सुशीलकुमार नायक,
उपविभागीय पोलिस अधिकारी, नांदा

संपादन - नीलेश डाखोरे

loading image