सोयाबीनच्या दरात विक्रमी वाढ, शेतकऱ्यांनी विक्री केल्यानंतर झाली भाववाढ

soybean rate increases after farmer selling their seeds in yavatmal
soybean rate increases after farmer selling their seeds in yavatmal

यवतमाळ : सोयाबीनला सुरुवातीला तीन ते साडेतीन हजार रुपये क्विंटल दर होता. सध्या सहा हजार रुपये विक्रमी दर मिळत आहे. आतापर्यंतचा सोयाबीनचा हा सर्वाधिक दर आहे. सोयाबीनविक्री केल्यानंतर झालेली लक्षणीय वाढ शेतकऱ्यांचा भ्रमनिरास करणारी आहे. शेतकऱ्यांच्या घरातील सोयाबीन विकल्यानंतरच भाववाढ झाल्याने व्यापाऱ्यांचा फायदा अधिक आहे.

नगदी पीक म्हणून जिल्ह्यातील शेतकरी सोयाबीनचे पीक घेतो. गतवर्षी दोन लाख हेक्‍टरवर सोयाबीनची लागवड झाली होती. परतीच्या पावसाने धूमाकुळ घातल्याने खरिपाचे होत्याचे नव्हते झाले. शेतात सोंगणी करून ठेवलेली सोयाबीन पिके पाण्याखाली गेलीत. पावासात भिजल्याने सोयाबीन उताऱ्यात घट झाली. गुणवत्तेत फरक पडला. अत्यल्प दरात शेतकऱ्यांना सोयाबीनविक्री करावी लागली. शेतीसाठी लावलेला खर्चदेखील निघाला नाही. सुरुवातीला तीन हजार 200 ते तीन हजार 500 रुपये प्रतिक्विंटल दराने शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्री केली. एक महिन्यापासून सोयाबीनच्या दरात वाढ होत आहे. साडेसहा हजार रुपयांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. सध्या बाजारपेठेत सोयाबीनला सहा हजार 450 रुपयांचा भाव मिळत आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या घरात सोयाबीनचा दाणादेखील शिल्लक नाही.  त्याचा फायदा शेतकऱ्यांना कमी व्यापाऱ्यांनाच अधिक होत आहे. उत्पादनापेक्षा उत्पादनखर्च अधिक अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांनी सोयाबीन लागवडीसाठी खूप मोठा खर्च केला. मात्र, गुणवत्ता घसरल्याने तोटा झाला. उच्चप्रतीच्या सोयाबीनच्या कमतरतेमुळे मुबलक प्रमाणात सोयाबीनचे बियाने मिळणे कठीण झाले आहे. येत्या हंगामात बियाण्याचे दर वाढण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

खरिपात हवामान चांगले असल्याने सहा एकर सोयाबीन पिकाची लागवड केली होती. परतीच्या पावसामुळे सोयाबीनचे नुकसान झाले. लावलेला खर्चदेखील निघाला नाही. बाजारपेठ अपेक्षित भाव मिळाला नाही. त्यामुळे नुकसानच झाले. आता सोयाबीन दर वाढले असले तरी शेतकऱ्यांकडे सोयाबीन शिल्लक नाही. 
- गणेश चव्हाण, शेतकरी, तपोना.

घरीच तपासा उगवणक्षमता -
यंदाही बाजारात उच्चप्रतीच्या सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा राहण्याची शक्‍यता आहे. शेतकऱ्यांनी घरचेच बियाणे वापरावे असे आवाहन कृषी विभागाकडून केल्या जात आहे. सोयाबीनची उगवण क्षमता घरच्या घरी तपासण्यासाठी मार्गदर्शन सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. एक पेपर घेऊन त्यांच्या चार घड्या पाडाव्यात. तो कागद ओला करावा. प्रत्येकी दहा बिया घेऊन एका रांगेत समान अंतरावर सोडून त्यांची गुंडाळी करावी. अशा शंभर बियांच्या 10 गुडांळ्यात तयार कराव्यात. त्या पॉलिथिन पिशवीत चार दिवस ठेवाव्यात. त्यानंतर बीजांकृत झालेल्या बिया मोजाव्यात. ती संख्या 50 टक्के असेल तर उगवणक्षमता 50 टक्के समजावी. असे किमान तीन वेळा प्रयोगकरुन बियाण्यांची उगवण क्षमता चाचणी करून घेण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com