सोयाबीन निघताच भाव गडगडले, हमीभावापेक्षाही मिळाला कमी दर

soybean
soybeane sakal

यवतमाळ : यंदा खरिपाच्या सुरुवातीपासूनच दमदार पाऊस आहे. त्यामुळे पिकेही जोमदार आहेत. यावर्षी महाराष्ट्रात सोयाबीनचे जास्त पीक होईल, अशी आशा आहे. सध्या सोयाबीन काढणे सुरू असून बाजारभावात (soybean rate) घसरण झाल्याने शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे. यंदाही शेतकरी अस्मानी संकटांसोबत सुलतानी संकटाचा सामना करीत आहे. राज्यातील लातूर, परभणी व विदर्भातील घाटंजी या ठिकाणी हमी भावापेक्षाही कमी भाव सोयाबीनला मिळाला.

soybean
शेतकऱ्यांनो, सोयाबीन विक्रीची घाई करू नका! व्यापाऱ्यांचे आवाहन

यावर्षी महाराष्ट्रात सोयाबीनचा पेरा वाढला आहे. 38 लाख हेक्टरवरून 46 लाख हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली. प्रथमच इतका मोठा पेरा वाढला आहे. अनुकूल हवामान व समाधानकारक पावसामुळे यंदा सोयाबीनचे बम्फर पीक होईल, अशी सर्वांनाच अपेक्षा आहे. सध्या शेतशिवारात सोयाबीन काढणीला वेग आला आहे. परंतु, अतिपावसाने धोका वाढविला आहे. ऐन काढणीदरम्यान रोज पाऊस येत आहे. त्यामुळे शेंगा शेतातच तडकत आहेत. शेंगांना कोंबे फुटली आहेत. नैसर्गिक संकटाचा सामना सुरू असताना बाजारात सोयाबीनचे भाव गडगडले. गेल्या पंधरवड्यात साधारणत: 2200 ते 2300 रुपयांनी भाव कमी झाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत आठ हजारांनी भाव घटले आहेत. सोयाबीन निघताच भाव घसरल्यामुळे शेतकर्‍यांच्या चेहर्‍यावरील आनंद लोपला आहे. यावर्षी सोयाबीनला 3,950 रुपये प्रतिक्विंटल इतका हमी भाव आहे. आजच्या तारखेत सोयाबीनचे दर प्रतिक्विंटल 5,500 ते 6,000 हजार रुपये असले तरी काल (ता. 24) कारंजा (जि. वाशीम) येथील बाजार समितीत 400 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. तसेच सर्वाधिक 6,450 रुपये व सर्वांत कमी 6,400 रुपये इतका दर मिळाला. आवक वाढताच दर आणखी कमी होण्याचा धोकाही शेतकर्‍यांना सतावत आहे. यवतमाळ जिल्ह्यात सतत पाऊस सुरू असल्याने अद्याप सोयाबीनची आवक वाढली नाही. ऑगस्ट 2021 मध्ये उच्चांकी दहा हजार दर मिळाला. तर चार सप्टेंबरपासून भावाची घसरगुंडी सुरू झाली. ऑगस्ट ते सप्टेंबर या दोन महिन्यांतच चार हजार ते साडेचार हजार रुपयांनी भाव घटले. त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

सोयाबीनचे दर (प्रतिक्विंटल)

ऑगस्ट : 10,000 रुपये

सप्टेंबर

  • पाच सप्टेंबर : 9000 रुपये

  • 12 सप्टेंबर : 8600 रुपये

  • 16 सप्टेंबर : 8400 रुपये

  • 19 सप्टेंबर : 8000 रुपये

  • 20 सप्टेंबर : 7000 रुपये

  • 21 सप्टेंबर : 6100 रुपये

  • 24 सप्टेंबर : 5800 रुपये

  • 25 सप्टेंबर : 5500 रुपये

’सोयाबीन निघताच भाव पाडणे हा मार्केटचा ट्रेंड आहे. व्यापारी शेतमाल निघताच कमी भावात खरेदी करतात. साठवणूक करून चढ्या भावात विकतात, नफेखोरी करतात. शासनाने याची दखल घेतली पाहिजे.’
-रमेश कटके, जिल्हा उपनिबंधक, सहकार विभाग, यवतमाळ.
’केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे सोयाबीन उत्पादकांना फटका बसला आहे. काल राज्यातील लातूर, परभणी व विदर्भातील घाटंजी या ठिकाणी हमी भावापेक्षाही कमी भाव सोयाबीनला मिळाला. हमीभाव 3940 रुपये असताना 3640 रुपये इतका प्रतिक्विंटल दर मिळाला. केंद्र सरकार व्यापारीधार्जिणे आहेत.’
-किशोर तिवारी, अध्यक्ष, शेतकरी मिशन.
’केंद्र सरकारने परदेशातून तेलाची व सोयाबीनच्या ढेपीची आयात सुरू केली व तेलावरील आयात शुल्क कमी केल्यामुळे सोयाबीनचे भाव घटले आहेत. याचा परिणामी देशातील सोयाबीन उत्पादकांना भोगावा लागत आहे. ऐन हंगामाच्या तोंडावर हा निर्णय घेऊन सरकारने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान केले आहे.’
-निखिल जैत, जिल्हा परिषद सदस्य, वटफळी ता. नेर.
’केंद्र सरकारच्या चुकीचा धोरणाचा हा परिणाम आहे. ऐन हंगामात व्यापार्‍यांनी भाव पाडले आहेत. माईश्‍चरमुळेही भाव कमी मिळत आहे. हमीभावात वाढ केली असली तरी बी-बियाणे, रासायनिक खते, औषधे व मजुरीही वाढली आहे. त्यामुळे मिळणार्‍या भावातून उत्पादन खर्चही निघणार नाही.
-प्रवीण ठाकरे, शेतकरी, करंजखेड, ता. महागाव.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com