esakal | यंदा सोयाबीनचा हंगाम लांबणार, मागणी वाढल्याने मिळणार विक्रमी दर
sakal

बोलून बातमी शोधा

soybean

यंदा सोयाबीनचा हंगाम लांबणार, मागणी वाढल्याने मिळणार विक्रमी दर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अमरावती : यंदा सोयाबीनचा हंगाम लांबण्याचा अंदाज जाणकारांनी वर्तविला आहे. किमान पंधरा दिवस हंगाम उशिराने सुरू होण्याची शक्यता आहे. दरम्यान सोयाबीन प्रक्रिया उद्योगाकडून आतापासूनच मागणी वाढल्याने सोयाबीनच्या (soybean rate) दरात आगामी हंगामात तेजीचे संकेत आहेत.

हेही वाचा: सरकारच्या आयाती धोरणामुळे सोयाबीन उत्पादकांवर संकट

सरत्या हंगामात 3300 रुपयांहून सोयाबीनने 10 हजारांचा पल्ला गाठला आहे. चढ्या दरांचा लाभ शेतकऱ्यांना कमी व व्यापारी, स्टॉकिस्टना अधिक झाला आहे. सध्याही सोयाबीनचे दर चढलेलेच आहेत. मात्र, त्याचा लाभ शेतकऱ्यांना होण्याची शक्यता नाही. यंदा पेरणी उशिराने झाल्याने हंगाम उशिरा सुरू होण्याची चिन्हे आहेत.

सद्यस्थितीत देशांतर्गत सोयाबीनचा तुटवडा आहे. दरवर्षी यावेळी दोन ते तीन लाख टन साठा शिल्ल्क राहायचा. यंदा मात्र तो नगण्य आहे. त्याचाच परिणाम भाव चढण्यात झाला आहे. सोयाबीन प्रक्रिया उद्योगांकडून मागणी वाढत असल्याने विक्रेत्यांनी सोयाबीनचे दर चढे ठेवले आहे. सोयाबीनचा मुख्य उत्पादक मध्य प्रदेशात यंदा सोयाबीन कमी आहे.

पेरणी उशिराने झाल्याने उत्पादनही उशिरा येण्यास सुरुवात होईल. दरवर्षी एक ऑक्टोबरला सोयाबीनचा हंगाम सुरू होतो. यंदा पंधरा दिवस ते महिनाभर हंगाम लांबण्याची शक्यता आहे. अशातच चीनकडून सोयाबीन व सोयापेंडची मागणी वाढली आहे. यंदा त्यामुळेच आगामी हंगामात सोयाबीनला चढ्या दरांची झळाळी लाभण्याची शक्यता आहे. शासनाने दिलेल्या 3970 रुपये प्रती क्विंटल हमीभावापेक्षा खुल्या बाजारात भाव चढलेले राहतील, किमान पाच हजारांवर भाव राहू शकतात, असा जाणकारांचा अंदाज आहे.

loading image
go to top