esakal | सोयाबीनवर खोडमाशी, पीक पडले पिवळे 
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

या खोडमाशीमुळे पिकांची वाढ खुंटून उत्पन्नात घट होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे शेतकरी बांधव चिंताग्रस्त झाले आहे. कृषी विभागाने याची दखल घेऊन तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 

सोयाबीनवर खोडमाशी, पीक पडले पिवळे 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ/श्रीरामपूर/कुंभा : यंदा खरीपात सोयाबीन बियाणे निकृष्ट दर्जाचे निघाल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले. तर, या संकटाला सामोरे गेल्यानंतर सोयाबीन पिकावर खोडमाशीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्याचे दिसून आले आहे. संपूर्ण पिकच पिवळे पडत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. जिल्ह्यातील अनेक भागातील शेतकऱ्यांनी कृषी विज्ञान केंद्र, तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रारी केलेल्या आहेत. 

हे वाचा—नागपुरातही आहेत "डान्सिंग अंकल'; वजन 105 किलो तरीही...
 

श्रीरामपूर परिसरातील वालतूर (रेल्वे), भोजला, जांब (बाजार), वनवार्ला, निंबी, पार्डी, पारवा, लोणी, पाळोदी, व आरेगाव, शेंबाळपिंपरी शिवारातील शेकडो हेक्‍टरवरील सोयाबीनचे पीक पिवळे पडले आहे. तर आरेगाव परिसरात चक्रभूंगा या रोगाचा प्रादूर्भाव दिसत आहे. पिकाची पाहणी केली असता खोडमाशीचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून आले. वालतूर (रेल्वे) शिवारात मंडळ कृषि अधिकारी भारत चेके व कृषी सहाय्यक सचिन राठोड यांनी सोमवारी (ता. 6)प्रत्यक्ष सोयाबीन प्लॉटची पाहणी केली. त्यांनी विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना सूचविल्या. तसेच उपविभागीय कृषी अधिकारी डॉ. प्रशांत नाईक यांनीही मंगळवारी (ता. 7) महागाव तालुक्‍यातील कासारबेहळ येथील शेतशिवारात भेट दिली. अशोक करे, संभाजी पिटलेवाड, मोहर करे आदी शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यांना उपाययोजना सूचविल्या. त्यांनी खोडमाशीचे नियंत्रण करण्यासाठी कृषि विद्यापीठाने सूचविलेल्या उपाययोजना करण्याचा सल्ला दिला. तर, 
मारेगाव तालुका कृषी अधिकारी राकेश दासरवार, कृषी सहाय्यक कोल्हे, पवार यांनी आज (ता. सात) गदाजी (बोरी) येथील पुरुषोत्तम पिंपळकर व कोतुरला येथील नीलेश टोंगे यांच्या शेतात सोयाबीन पिकाची पाहणी केली. त्यांनी खोडमाशीचा प्रादुर्भाव झाल्याचे निदर्शनास आले. तर, यवतमाळ तालुक्‍यातील हिवरी, नाकापार्डी, वाटखेड, माळमसोला, भांब राजा, बेचखेडा, बोरी गोसावी, रामनगर, साकूर, मांगूळ, बेलोरा, वाई, रुई आदी शेतशिवारातील पिकेही पिवळी पडली आहेत. या खोडमाशीमुळे पिकांची वाढ खुंटून उत्पन्नात घट होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे शेतकरी बांधव चिंताग्रस्त झाले आहे. कृषी विभागाने याची दखल घेऊन तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 


प्रत्यक्ष कोथरुला येथील शेतशिवारात जाऊन सोयाबीन पिकाची पाहणी केली असता खोडमाशीचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून आले.
-राकेश दासरवार,तालुका कृषी अधिकारी, मारेगाव