esakal | 'आम्ही यवतमाळकर' विशेष मोहीम: कोरोना नियंत्रणसाठी घरोघरी सर्वेक्षण; 1,898 पथकांची निर्मिती
sakal

बोलून बातमी शोधा

abc

शहरी व ग्रामीण भागात 1,898 पथकांची निर्मिती करण्यात आली असून 218 पर्यवेक्षक नियुक्त करण्यात आले आहे. 'आम्ही यवतमाळकर....' या विशेष मोहिमेच्या अनुषंगाने प्रत्येक गावात ग्रामस्तरीय कोरोना नियंत्रण समिती आणि नगरपालिका क्षेत्रामध्ये नागरी कोरोना नियंत्रण समितीची स्थापना करण्यात आली आहे. 

'आम्ही यवतमाळकर' विशेष मोहीम: कोरोना नियंत्रणसाठी घरोघरी सर्वेक्षण; 1,898 पथकांची निर्मिती

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या व मृत्यूचे प्रमाण वाढत चाले आहे. वाढत्या संकटावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने 'आम्ही यवतमाळकर....मात करू कोरोनावर' ही विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. घरोघरी जाऊन पथकाचे कर्मचारी सर्वेक्षण करणार आहेत.

शहरी व ग्रामीण भागात 1,898 पथकांची निर्मिती करण्यात आली असून 218 पर्यवेक्षक नियुक्त करण्यात आले आहे. 'आम्ही यवतमाळकर....' या विशेष मोहिमेच्या अनुषंगाने प्रत्येक गावात ग्रामस्तरीय कोरोना नियंत्रण समिती आणि नगरपालिका क्षेत्रामध्ये नागरी कोरोना नियंत्रण समितीची स्थापना करण्यात आली आहे. 

Success Story: हिरव्यागार शेतात वन्य प्राण्यांचा धुमाकूळ थांबणार; इंजिनियर्सनी बनवली `इलेक्ट्रिक...

सोमवारपासून (ता.12) सर्वेक्षणाला प्रारंभ झाला आहे. मोहिमेंतर्गत ग्रामस्तरावर व नगरपालिका स्तरावर पथकांची निर्मिती करून या पथकाद्वारे घरोघरी जाऊन नागरिकांच्या आरोग्याची माहिती घेण्यात येणार आहे. यात कोविडबाबत पंचसुत्री जसे मास्कचा सतत वापर करणे, सामाजिक अंतर राखणे, वारंवार हात धुणे, पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्यास त्वरीत कोविड चाचणी करणे आणि 45 वर्षे पूर्ण झालेल्या पात्र नागरिकांचे लसीकरण करणे याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.

तालुकानिहाय पथकं

यवतमाळसाठी 137 पथके, बाभूळगाव 98, कळंब 130, घाटंजी 105, राळेगाव 124, पांढरकवडा 135, वणी 126, मारेगाव 99, झरी 59, आर्णी 77, दारव्हा 130, दिग्रस 119, नेर 87, उमरखेड 124, महागाव 170 आणि पुसदसाठी 178 पथकं निर्माण करण्यात आले आहेत.

कोरोनाच्या मृत्यूछायेतही चैत्रपालवीचा तजेला कायम; ऋतुराज वसंताला साद घालत रानोमाळ कोकीळकूजन

सर्वेक्षणादरम्यान कुटुंबातील व्यक्तिंना ताप, सर्दी, खोकला, श्वास घेण्यास त्रास आदी लक्षणे आहे काय, वृद्घ, दिव्यांग, सहव्याधीग्रस्त व्यक्तिंना काही त्रास आहे काय, कुटुंबातील कोणी व्यक्ती कोविड रुग्णाच्या संपर्कात आला आहे काय, त्याला काही लक्षणे आहेत काय, कुटुंबातील 45 वर्षांवरील पात्र सदस्यांनी लसीकरण केले आहे काय, आदींची माहिती जाणून घेण्यात येईल.
-अमोल येडगे
जिल्हाधिकारी, यवतमाळ.

संपादन - अथर्व महांकाळ 

loading image