स्पेशल स्क्‍वॉड की वसुली पथके?

अनिल कांबळे
शुक्रवार, 14 डिसेंबर 2018

नागपूर - शहरातील कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवण्याच्या नावाखाली तयार केलेले जात असलेले ‘स्पेशल स्क्‍वॉड’ वसुली पथकच झाले आहे. सध्या शहरात पाच परिमंडळातील पाचही पोलिस उपायुक्‍तांचे प्रत्येकी एक याप्रमाणे पाच स्पेशल स्क्‍वॉड आहेत. आता अनेक वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या स्कॉडची भर पडणार असून त्यात नियुक्ती व्हावी याकरिता अनेकांची धडपड सुरू आहे.

नागपूर - शहरातील कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवण्याच्या नावाखाली तयार केलेले जात असलेले ‘स्पेशल स्क्‍वॉड’ वसुली पथकच झाले आहे. सध्या शहरात पाच परिमंडळातील पाचही पोलिस उपायुक्‍तांचे प्रत्येकी एक याप्रमाणे पाच स्पेशल स्क्‍वॉड आहेत. आता अनेक वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या स्कॉडची भर पडणार असून त्यात नियुक्ती व्हावी याकरिता अनेकांची धडपड सुरू आहे.

शहरातील गुन्हेगारी वाढत असतानाच ठाण्यात दाखल असलेल्या अनेक प्रकरणात पोलिसांना तपासात अपयश आल्याची धक्‍कादायक माहिती समोर आली आहे. स्थानिक पोलिस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अवैध धंद्यावाल्यांशी साटेलोटे असल्यामुळे त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सहायक पोलिस आयुक्‍त ते अतिरिक्‍त पोलिस आयुक्‍त दर्जाचे अधिकारी स्वतंत्र स्क्‍वॉड तयार करतात. त्यामध्ये ‘कर्तबगार’ पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा भरणा केला जातो. हे पथक शहरातील जुगार, क्रिकेट सट्‌टेबाजी, वरली-मटका,गांजाविक्री तसेच दारूविक्री करणाऱ्यांवर छापे घालतात. या कारवाई करण्यासाठी पुन्हा स्थानिक पोलिसांच्या ताब्यात देतात. मात्र, महिन्याभरानंतर पोलिस ठाण्यातील हद्दीतील अवैध धंदे पुन्हा सुरू होतात. त्यामुळे विशेष पथकाच्या कार्यप्रणालीवर संशय निर्माण झाला आहे. शहरात पाच परिमंडळातील पोलिस उपायुक्‍तांकडे स्पेशल स्क्‍वॉड आहे. यापूर्वी अतिरिक्‍त पोलिस आयुक्‍तांचेही पथक होते. सूत्रांच्या माहितीनुसार आता प्रत्येक वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या स्क्‍वॉडची स्थापना करण्यात येणार आहे. 

विशेष पथकाची परवानगी 
पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंदे किंवा काळाबाजार करणाऱ्यांना आता विशेष पथकाचीही परवानगी घेण्याचा सल्ला पोलिस ठाण्यातील अधिकारी देतात. जेणेकरून क्रिकेट सट्‌टेबाजी,  जुगार आणि दारूविक्रीसारख्या धंद्यांवर छापे पडू नयेत. प्रत्येक धंदेवाल्यांशी पोलिसांची सेटिंग असल्यामुळे छापेमारी कमी झाल्याची चर्चा आहे.

रायटर्सची बक्कळ कमाई?
प्रत्येक वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा रायटर हा ‘सेटलर’ असतो. कोणताही अवैध धंदेवाला अधिकाऱ्याच्या रायटरची भेट घेतो. त्याच्याकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतरच अवैध धंद्यांची शहरात सुरुवात होते. त्यामुळे वरिष्ठांचा राइट हॅंड असलेल्या रायटरचीही बक्‍कळ कमाई असते. डीबी पथकापासून ते विशेष पथकापर्यंचे संचलन रायटर करीत असल्याची माहिती आहे.

गुन्हे शाखेला महत्त्व 
तत्कालिन पोलिस आयुक्‍त के. वेंकटेशम्‌ यांच्या कारकिर्दीत कोणतीही विशेष पथके नव्हती. सर्व अधिकारी गुन्हे शाखेला होती. आता अनेक पथके स्थापन झाल्यामुळे तसेच पथकात ‘विशेष’ कर्मचाऱ्यांनाच स्थान मिळत असल्यामुळे पोलिस विभागात अनेकांमध्ये नाराजीचा सूर आहे.

Web Title: Special Squad or Recovery Squads in nagpur