तब्लीगी इज्तिमासाठी रेल्वेच्या विशेष गाड्या

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 नोव्हेंबर 2019

  • बडनेरा येथे साजरा होणार इज्तिमा
  • नागपूर, मनमाड, बल्लारशहा वरून गाड्या
  • अकोला, शेगाव, मलकापूरला थांबा
  • मध्य रेल्वेच्या वतीने सुविधा

बुलडाणा : अमरावती जिल्ह्यातील बडनेरा येथे तब्लीगी इज्तिमा उत्सव होणार असून, यानिमित्त देशातील विविध भागातून येणाऱ्या नागरिकांना सुविधा व्हावी यासाठी मध्य रेल्वेच्या वतीने विशेष रेल्वे गाड्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामध्ये मनमाड ते बडनेरा आणि नागपूर ते मनमाड आणि बल्लारशाह ते बडनेरा आणि बडनेरा बल्लारशहा गाड्यांचा समावेश आहे. 

मनमाड, नागपूर वरून सुटणाऱ्या गाड्यांचे नियोजन
मनमाड ते बडनेरा ही विशेष साधारण गाडी शुक्रवार 6 डिसेंबरला मनमाड येथून 14.50 वाजता सुटणार असून, त्याच दिवशी रात्री 23.45 वाजता बडनेराला पोहोचणार आहे. नागपूर ते मनमाड विशेष साधारण गाडी 9 डिसेंबरला नागपूर येथून 17.30 वाजता सुटणार असून, दुसऱ्या दिवशी 4.20 मनमाडला पोहोचणार आहे. ही गाडी वर्धा, धामणगाव, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव येथे थांबा घेणार आहे.

बल्लारशाह वरून सुटणाऱ्या गाडीचे नियोजन
बल्लारशाह ते बडनेरा ही साधारण गाडी 6 डिसेंबरला बल्लारशाह येथून 14 वाजता सुटणार असून, 18.35 ला बडनेराला पोहोचणार आहे तर, बडनेरा ते बल्लारशाह विशेष साधारण गाडी 9 डिसेंबरला बडनेरा येथून 23.40 येथून सुटणार असून, दुसऱ्या दिवशी सकाळी 4 वाजता बल्लाहशाह येथे पोहोचणार आहे. ही गाडी धामणगाव, वर्धा, वरोरा, चंद्रपूर येथे थांबणार आहे. प्रवाशांनी योग्य तिकीट आणि रेल्वेचे नियमाचे पालन करत प्रवास करावा असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Special trains to Tabligi Iztimah