Govindpur Accident: गडचिरोलीत भरधाव कारच्या धडकेत एकाचा मृत्यू; तीन जण गंभीर जखमी
Accident News: गडचिरोलीतील गोविंदपूर गावात भरधाव कारने तीन मोटारसायकलींना धडक दिली. यामध्ये विजय सुखदेव सातपुते यांचा जागीच मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले.
गडचिरोली : गडचिरोली मुख्यालयापासून १४ किमी अंतरावर चामोर्शी रोडवर असलेल्या गोविंदपूर या गावात एक भरधाव कारने तीन मोटारसायकलींना जोरदार धडक दिल्याने एकाचा मृत्यू तर एका महिलेसह तीन जण गंभीर जखमी झाले. ही घटना शनिवार (ता. १६) दुपारी एक वाजता घडली.