sport
sport

अर्थसंकल्पात क्रीडा विभाग ‘क्लीन बोल्ड’

अकोला: केंद्र सरकारने एक फेब्रुवारी रोजी सादर केलेल्या अर्थसंकल्पात क्रीडा विभागासाठी कुठलाच ठोस निर्णय नसल्याने ग्रामीण भागातील खेळाडूंची प्रगती कशी होणार राष्ट्रीय स्तरावर जाण्यासाठी लागणारी मेहनत आणि त्यासाठी आवश्यक ते उपाय योजना सरकारकडून जाहीर झाल्या नाहीत. या अर्थसंकल्पात क्रीडा विभागासाठी कुठलाच ठोस निर्णय घेण्यात न आल्याने विभागातील मान्यवरांनी या अर्थसंकल्पात क्रीडा विभाग अक्षरक्षः क्लीन बोल्ड झाला असल्याच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

सुविधांची उपलब्धता करून देण्याची आवश्यकता
ग्रामीण भागातील खेळाडू हे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले नाव उज्वल करत आहे खेळाडूंना ऑलिम्पिकमध्ये पदक मिळविण्यासाठी त्या पद्धतीचे तंत्रज्ञान साहित्य भौतिक सुविधांची उपलब्धता करून देण्याची आवश्यकता आहे आधुनिक दर्जेदार साहित्य आणि सुविधा उपलब्ध करून दिल्यास देशाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावण्यास खेळाडूंना अधिक संधी प्राप्त होतील.
-सतीशचन्द्र भट, राज्य क्रीडा मार्गदर्शक.

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर या खेळांमध्ये करणे आवश्यक
आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त असलेल्या खेळांना तांत्रिक पद्धतीने खेळण्याची आवश्यकता असून त्या अनुषंगाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर या खेळांमध्ये करणे आवश्यक आहे या माध्यमातून खेळाचा सर्वांगीण विकास साधणे शक्य होईल.
-प्रभाकर रुमाले, राष्ट्रीय कबड्डीपटू व राष्ट्रीय पंच कबड्डी.

सुधारणा होण्याची आवश्यकता
खेळामध्ये सातत्याने सुधारणा होण्याची आवश्यकता आहे खेळ केवळ खेळा पुरताच मर्यादित न राहता ती एक नोकरी या अंगणी खेळाकडे पाहणे दृष्टीने त्यासाठी केंद्र शासनाने विशिष्ट अशा तरतुदी आवश्यकता करणे आवश्यक आहे या माध्यमातून खेळाला एका उंचीवर घेऊन जाणे शक्य होईल
-प्रभजीत सिंह बछेर, उपाध्यक्ष आल इंडिया कॅरम फेडरेशन दिल्ली.


स्पर्धांकरिता आर्थिक पाठबळ देऊन खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे
आंतरराष्ट्रीय स्तरावर शरीरसौष्ठव स्पर्धेत खेळाडूंना प्रचंड मोठ्या प्रमाणात संधी आहेत. या क्षेत्राकडे वळण्यासाठी शासनाच्या माध्यमातून सक्षम असे पाठबळ देण्याची आवश्यकता आहे. तसेच विविध स्पर्धांकरिता आर्थिक पाठबळ देऊन खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे याकरता निधीची कमतरता न भासू देता आंतरराष्ट्रीय स्तराच्या मला पात्र असलेली खेळाडू घडविण्याचे काम करावे
-संतोष देशमुख, आंतरराष्ट्रीय पंच शरीर सौष्ठव.

सुसज्ज, आधुनिक मैदाने खेळ साहित्य उपलब्ध करून देण्याची आवश्यकता
क्रिकेट, फुटबॉल या खेळामध्ये अकोल्याचे नाव राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजवणारे खेळाडू आहेत. खेळाडूंना शासनाच्या वतीने सुसज्ज अशी आधुनिक मैदाने खेळ साहित्य उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे. या माध्यमातून त्यांची उन्नती आणि प्रगती करता येणे शक्य होईल यासाठी विशिष्ट अशी निधीची वार्षिक तरतूद करणे आवश्यक आहे.
-जावेद आली, क्रिडा समन्वयक, जिल्हा परिषद क्रीडा सदस्य.

शासनाने पुन्हा पाठ फिरविली
अर्थसंकल्पामध्ये क्रीडा क्षेत्राकडे शासनाने पुन्हा पाठ फिरविली आहे. क्रीडा क्षेत्राबाबत कोणताही ठोस निर्णय या अर्थसंकल्पामध्ये घेण्यात आलेला नाही. क्रीडा क्षेत्रात माजी आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या नावे कोणताही पुरस्कार जाहीर करण्याबाबत ठोस निर्णय झाला नाही.
-धीरज पृथ्वीराज चव्हाण, सचिव हॉकी असोसिएशन, अकोला.

राजकारण न करता देशहित महत्त्वाचे
धोरणामध्ये खेळाच्या सर्वांगीण विकास करता शासनाने प्रयत्नशील असावे खेळ आणि खेळ संघटना यांचा समन्वय घडवून देशाचे नाव उंचावण्यासाठी प्रत्येक घटकाने पुढाकार घ्यावा. कुठलीही राजकारण न करता देशहित महत्त्वाचे माणून त्यादृष्टीने प्रयत्न करणे आवश्यक आहेत.
-संजय मैंद, सचिव अजिशा शिक्षक महामंडळ. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com