Devgaon Rangari News : कर्तव्य बजावून परतलेल्या SRPF जवानाचे डेंग्यू-मलेरियाने निधन; चांभारवाडीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

छत्रपती संभाजीनगर राज्य राखीव पोलीस दलातील (SRPF) तरुण जवानाचे डेंग्यू आणि मलेरियासारख्या तीव्र संसर्गजन्य आजाराने उपचारादरम्यान झाले निधन.
SRPF jawan Amol Ravate

SRPF jawan Amol Ravate

sakal

Updated on

देवगाव रंगारी - गडचिरोली येथे नक्षलग्रस्त भागात देशसेवेचे कर्तव्य बजावून परतलेल्या छत्रपती संभाजीनगर राज्य राखीव पोलीस दलातील (SRPF) तरुण जवानाचे डेंग्यू आणि मलेरियासारख्या तीव्र संसर्गजन्य आजाराने उपचारादरम्यान निधन झाले. अमोल पुंडलिक रावते (वय ३२, रा. चांभारवाडी) असे या दिवंगत जवानाचे नाव आहे. त्यांच्या निधनाने चांभारवाडी आणि परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत असून, सोमवारी (ता.20) त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com